Viral Message : कोरोनाचे (Corona) दोन डोस घेतले असतील तर तुम्हाला केंद्र सरकार (Central Government) 5 हजार रुपये देणार असा दावा करण्यात आला आहे. कोरोना काळात कोट्यवधी लोकांनी कोरोनाचे दोन डोस (Vaccination) घेतलेत. त्यामुळे प्रत्येकालाच या दाव्याबाबत माहिती हवीय. पैसे कसे मिळणार? त्यासाठी काय करायला हवं हे सगळं मेसेजमध्ये सांगण्यात आलंय. व्हायरल मेसेजसोबत (Viral Message) फॉर्मची लिंकही पाठवण्यात आलीय. पण हे खरं आहे का? केंद्र सरकार पैसे देणार आहे का? याची आम्ही पोलखोल करण्याचा प्रयत्न केला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही याबाबत सरकारच्या संबंधित डिपोर्टमेंटशी बोलून माहिती विचारली. पण अशी कोणतीही योजना नसल्याचं  त्यांनी सांगितलं. मग हा मेसेज कुणी पाठवलाय याचा शोध घेतला. त्यावेळी याचं सत्य समोर आलं. केंद्राच्या पीआयबीय ट्विटर वरूनच हा मेसेज खोटा असल्याचं सांगण्यात आलं. 


व्हायरल पोलखोल
कोरोनाचे 2 डोस घेतलेल्यांना पैसे मिळणार हा दावा खोटा आहे. केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही. मेसेजसोबत पाठवलेल्या लिंकवर माहिती देऊ नका. तुमची वैयक्तिक माहिती चोरीचा प्लॅन आहे


त्यामुळे तुम्हाला अशी लिंक आली असल्यास डिटेल्स भरू नका. पैसे मिळण्याऐवजी तुमच्याच खात्यातील पैसे जाऊ शकतात. आमच्या पडताळणीत दोन डोस घेतलेल्यांना पैसे मिळणार हा दावा असत्य ठरला.


राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ
दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात 425 नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. 
सुदैवाने राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेलीनाही .सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 % इतका आहे. तर राज्यात  एकूण 3090 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


काल राज्यात सर्वाधिक 694 नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालं होतं. यापैकी मुंबईत 192 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती.  राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 हजार 90 वर पोहोचलीय.  त्यामध्ये मुंबईतील 846 तर ठाण्यातील 524 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे.


कोरोना अजून गेलेला नाही, मास्क वापरा
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची बैठक झाली होती. कोरोना अजून गेलेला नाही, मास्क वापरा, आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा, कोरोना पसरवू देऊ नका, असे आवाहन यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केलं होतं. पंतप्रधानांनी काही सूचना केल्या, यात सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा, साथ पसरु नये म्हणून यासाठी योग्य काळजी घ्या, कोरोना अजून गेलेला नाही. त्यामुळे मास्क वापरा, सर्व श्वसनरोगांच्या चाचण्यांसाठी प्रयोगशाळा सज्ज ठेवा आणि चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारणाबाबत सतर्क राहा. तसेच कोरोना लसीकरणावर भर द्या, असे सांगण्यात आलं.