कानपुर : युपीच्या कानपुरमध्ये लोकांना रिजर्व्ह बॅंकेऐवजी चिल्ड्रन बॅंकेच्या नोटा मिळत आहेत. ही घटना शनिवारी दुपारची आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील मार्बल मार्केटमध्ये काहीजण एक्सिस बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढायला गेले. पण बॅंक ऑफ इंडिया अस लिहिलेल्या खोट्या नोटा सापडल्या. 
 
या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर ब्रांच मॅनेजर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लोकांना शांत केले. 



सोमवारी बदलणार नोट 



 मी १० हजार रुपये काढयला गेलो पण मला खोट्या नोटा सापडल्या, असे घटनास्थळी उपस्थित असलेल्या सचिन नावाच्या व्यक्तिने सांगितले.


एटीएममध्ये असलेल्या सुरक्षारक्षकाच्या त्याने ही बाब ध्यानात आणून दिली.


सुरक्षा रक्षकाने ही तक्रार आपल्या तक्रार वहीत नोंद करून ठेवली. बॅंकेला या संदर्भात माहीती दिल्यावर सोमवारी रक्कम मिळेल असे बॅंकेने सांगितले. 


दोघांची तक्रार 



 पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आतापर्यत दोघांनी तक्रार दाखल केल्याचे कानपुर दक्षिणचे एसपींनी सांगितले.


एकाला दहा तर दुसऱ्याला २० हजारांच्या खोट्या नोटा सापडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.