Success Story:  रतन टाटा, मुकेश अंबानी हे देशातीलत नव्हे तर जगातील यशस्वी उद्योजक आहेत. यांच्याशी बरोबरी करणे म्हणजे मोठं चॅलेंजच आहे. मात्र, हे चॅलेंज एका महिलेने स्वीकारले आहे. फाल्गुनी नायर  (Falguni Nayar) असे महिलेचे नाव आहे.  20,700 कोटींची मालकिन असलेली ही महिला  थेट टाटा, अंबानींसोबत स्पर्धा करत आहेत. फाल्गुनी नायर  यांनी वयाच्या 50 व्या वर्षी आपले स्टार्टअप सुरु केले आहे. 


फाल्गुनी नायर  ‘Nykaa’ ब्रँडच्या फाऊंडर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फाल्गुनी नायर या ‘Nykaa’ ब्रँडच्या फाऊंडर आहेत. सध्या 'Nykaa' हा ब्रँड देशातील सर्वात मोठ्या ब्रँडपैकी एक ब्रँड बनला आहे.   फाल्गुनी नायर या Nykaa कंपनीच्या कार्यकारी अध्यक्ष, एमडी आणि सीईओ आहेत. 


टाटा, अंबानी यांच्या ब्रँडला टक्कर 


फाल्गुनी नायर यांचा Nykaa ब्रँड टाटा ग्रुपच्या कॉस्मेटिक ई-रिटेलिंग साइट 'टाटा क्लिक' आणि मुकेश अंबानींच्या ब्युटी ब्रँड 'टिरा'ला या ब्रँड्सना टक्कर देत आहे. दिवसेंदिवस Nykaa ब्रँड अधित प्रसिद्ध होत आहे. Nykaa खूपच लोप्रिय होत आहेत. 


भारतातील सर्वात श्रीमंत महिला CEO


फोर्ब्सच्या रिअल टाईम रिच लिस्टनुसार, भारतातील 13 अब्जाधीश महिला उद्योजकांमध्ये फाल्गुनी नायर यांचे नाव देखील सामील  झाले आहे. कंपनीच्या निर्णय प्रक्रियेत फाल्गुनी नायर यांचा थेट सहभाग असतो. अशा प्रकारे कंपनीचे सर्व निर्णय घेणाऱ्या त्या एकमेव सीईओ व्यावसायिक महिला आहेत. फाल्गुनी नायर या देशातील सर्वात श्रीमंत महिला सीईओ आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2.5 अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 20,700 कोटी रुपये इतकी आहे.



वयाच्या 50 व्या वर्षी फाल्गुनी नायर यांनी सुरू केला स्टार्टअप


ठरवले तर काहीही अशक्य नाही असे आणि वय हा फक्त आकडा असतो हे फाल्गुनी नायर यांनी त्यांच्या यशातून सिद्ध करुन दाखवले आहे. वयाच्या 50 व्या वर्षी फाल्गुनी नायर यांनी स्टार्टअप सुरु केला आणि तो यशस्वी देखील करुन दाखवला आहे. फाल्गुनी नायर यांनी आयआयएम-अहमदाबाद येथून शिक्षण घेतले आहे. जवळपास  20 वर्षे इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि ब्रोकिंग क्षेत्रात काम केले. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2021 मध्ये त्यांनी  Nykaa ब्रँड लाँच केला. अल्प कालावधीत या ब्रँडने मोठे यश मिळवले असून त्या सर्वात यशस्वी व्यावसायिक महिलांपैकी एक ठरल्या आहेत. Nykaa ब्रँड फक्त ई-रिटेलिंगच करत नाही तर या ब्रँडने स्वत:चे 35,000 प्रोडक्ट देखील लाँच केले आहेत. Nykaa चे देशभरात 17 स्टोर देखील आहेत. Nykaa ब्रँडने अनेक सेलिब्रिटींसोंबत पार्टनरशिप केली आहे.


हे दखील वाचा ...17 बँका असलेले भारतातील एकमेव गाव; जगभरातील मोठ्या बँकाना इथं का सुरु करायचीय आपली शाखा?