मुंबई : देशातील लोकप्रिय हेअर ड्रेसर जावेद हबीबला हृदय विकाराचा झटका आला आहे. जावेद हबीब हरियाणाच्या यमुनानगरमध्ये एका हेअर सलूनच्या उद्घाटनासाठी गेले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमावेळीच त्यांना हृदय विकाराचा झटका आला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तात्काळ त्यांना रूग्णालयात दाखल केलं. आता रूग्णालयातून त्यांची तब्बेत ठिक असल्याचं सांगितलं गेलं आहे. ही घटना तेव्हा घडली जेव्हा त्या हेअर सलूनचं उद्घाटन झालं होतं. आणि जावेद हबीब यांनी एका व्यक्तीचे केस कापण्यास सुरूवात केली होती. आणि त्यावेळी अनेक मीडियातील मंडळी देखील उपस्थित होते. याचवेळी अचानक छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना शहरातील उत्तम डॉक्टरकडे हलविण्यात आलं. 


यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड गोंधळ सुरू झाला. त्यांना तात्काळ रूग्णालयात हलवल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.आता त्यांची तब्बेत ठिक असल्याचं सांगण्यात येतं आहे. आपल्या साऱ्यांना माहितच आहे जावेद हबीब हे लोकप्रिय नावं आहे. मुंबईसह अनेक शहरात त्यांच्या हेअर सलूनची चैन आहे. अनेक मुली आणि मुलं देखील जावेद हबीब यांच्याकडून हेअर कट करून घेण्यास उत्सुक असतात.