Trending News In Marathi: जगभरातील काही प्रेक्षणीय स्थळ हे खूपच लोकप्रिय आहे. इथे जाण्यासाठी अनेक लोक धडपडत असतात. या स्थळाची सुंदरता पाहण्यासाठी लोक कितीही पैसे खर्च करायला तयार असतात. काही जण तर आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठीही या प्रेक्षणीय स्थळांचा आधार घेतात. पण कधीकधी याच प्रेक्षणीय स्थळांवर अनेक अपघातदेखील होत असतात. अलीकडेच एका लोकप्रिय प्रेक्षणीय स्थळाजवळ मोठा अपघात घडला आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काचेच्या पुलाबद्दल तर तुम्ही ऐकलं असेलच. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या काचेच्या पुलावरुन फिरत असताना अचानक तो तुटला तर काय होईल याचा विचार केला तर अंगाचा थरकाप उडेल. पण अलीकडेच असा अपघात घडला आहे. सोशल मीडियावर सध्या याचे फोटो व व्हिडिओ चर्चेत आहेत. इंडोनेशियातील लोकप्रिय 30 फूट उंचीवर बनवलेल्या काचेच्या पुलावरुन एक पर्यटक खाली कोसळला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. 


सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात तो व्यक्ती 30 फूटाच्या उंचीवरुन खाली कोसळताना दिसत आहे. व्हिडिओनुसार, ज्या वेळेस ही घटना घडली तेव्हा ब्रीजवर अनेक जण उभे होते मात्र तेव्हाच पुलावरील एका काचेला तडा गेला आणि एक व्यक्ती खाली कोसळला. इतक्या उंचीवरुन खाली पडल्यामुळं त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. व्हिडिओत एक व्यक्ती या पुलाच्या तुटलेल्या काचेत अडकलेला दिसत आहे. ज्याला लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं आहे. 


डेली मेल रिपोर्टनुसार, इंडोनेशियातील लोकप्रिय प्रेक्षणीय स्थळ असलेला काचेच्या पुलाची एक बाजू तुटून एका पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत. जेव्हा घटना घडली तेव्हा, मध्य जावाच्या सिलासेप येथील 11 पर्यटक बुधवारी सकाळी 10च्या सुमारास समुद्रसपाटीपासून जवळपास 30 फूट उंच असलेल्या जियोंग पुलावरुन जात होते. त्याचवेळी ही घटना घडली आहे. दरम्यान, अनेकदा पर्यटकांनी या पुलाच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित केले होते. एका व्यक्तीने म्हटलं आहे की, हा पूल सुरक्षित नाहीये, अपघातानंतर आता या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.