Crime News : भारतातील प्रसिद्ध रेडिओ जॉकी आणि इंस्टाग्राम इंफ्लुएंसर सिमरन सिंह (RJ Simran Singh) हिचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिमरन सिंहचा मृतदेह हरियाणा आणि दिल्लीजवळ असलेल्या गुरुग्राम शहरातील तिच्या फ्लॅटवर सापडला. गुरुग्रामच्या सेक्टर-47 च्या एका सोसायटीमध्ये ती भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती, तिथेच ती बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी प्राथमिक तपासात हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचं सांगितलं. परंतू मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं असून याच्या माध्यमातून मृत्यूचं नेमकं कारण काय याचा खुलासा होईल. सिमरनचा मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आलेला आहे. 


आत्महत्या की हत्या? पोलीसांचा तपास सुरू : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मूळची जम्मू शहरातील रहिवासी असणारी सिमरन सिंह ही मागील काहीकाळापासून रेडिओ जॉकी ऐवजी सोशल मीडिया इंफ्लुएंसर म्हणून जास्त कार्यरत होती. First Post च्या रिपोर्टमध्ये गुरुग्राम पोलिसांनी केलेल्या तपासानुसार सिमरनचा मृतदेह बुधवारी रात्री ती राहत असलेल्या फ्लॅटमध्ये सापडला. पोलिसांना सिमरनच्या  एका मित्राने याची माहिती दिली जो तिच्या सोबत फ्लॅटमध्ये राहत होता. 25 वर्षीय सिमरनचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला. तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पोलीस या घटनेचा सगळ्या बाजूने तपास करत आहेत. 


हेही वाचा : ना अंबानी, ना अदानी तरी रोज कमवतो 32 कोटी! जाणून घ्या 'भारताचा सर्वात श्रीमंत सेल्समन' करतो तरी काय


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by RJ SIMRAN (rjsimransingh)


सोशल मीडियावर होते लाखों फॉलोअर्स : 


डिओ जॉकी आणि इंस्टाग्राम इंफ्लुएंसर असलेली सिमरन सिंह ही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होती. तीच इंस्टाग्राम अकाउंट @rjsimransingh च्या बायोमध्ये तिने स्वतःला 'जम्मू ची धड़कन' म्हंटले होते. तिच्या चाहत्यांमध्ये ती याच नावाने लोकप्रिय होती. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जवळपास 6,82,000 फॉलोअर्स होते. तिच्या मृत्यूची माहिती समोर आल्यावर फॅन्सना धक्का बसला आहे. सिमरन सिंहने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेवटची पोस्ट 13 डिसेंबर रोजी केली होती. एका व्हिडीओमध्ये ती समुद्राच्या कुमारी खुश आणि उत्साही दिसत होती. आता या पोस्टखाली तिचे फॅन्स तिला भावपूर्ण श्रद्धांजली देत कमेंट्स करत आहेत.