Viral Video: विकी कौशलच्या (Vikcy Kaushal) 'बॅड न्यूज' (Bad News) चित्रपटातील 'तौबा तौबा' (Tauba Tauba) गाणं सोशल मीडियावर  (Social Media) प्रचंड व्हायरल आहे. या गाण्यावर फक्त सर्वसामान्य युजर्सच नाही तर सेलिब्रिटीदेखील रील तयार करत आहेत. यातील अनेक रीलदेखील व्हायरल होत असताना, आता एक नवं रील चर्चेत आहे. याचं कारण या गाण्यात श्रीलंकेचा महान गोलंदाज मुथय्या मुरलीधन डान्स करत आहे. नेटकरी सगळीकडे हा व्हिडीओ शेअर करत असून मुथय्या मुरलीधरनचं कौतुक करत आहेत. पण यामीगल सत्य वेगळंच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही व्हिडीओ पाहिलात तर त्याच्यामध्ये एका डान्स क्लासमध्ये सर्वजण नाचत आहेत. यातील मुख्य डान्सर हुबेहूब मुथय्या मुरलीधन वाटत आहे. पण जसं दिसत आहे त्यापेक्षा सत्य वेगळं आहे. याचं कारण व्हिडीओत जो डान्स करत आहे तो मुरलीधरन नसून, कोरिओग्राफर किरण जोपले आहे. किरण जोपले यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तुम्ही जाऊन पाहिलंत तर हा व्हिडीओ तुम्हाला तिथे दिसेल. 


'निर्लज्जपणे...,' तौबा तौबा गाण्याच्या क्रेडिटवरुन सुरु असलेल्या वादावर विकी कौशलही बोलला, 'आम्हालाच चपला, शिव्या...'


 


पण व्हिडीओत किरण आणि मुरलीधरन यांच्यात इतकं साम्य वाटत आहे की नेटकरी बुचकळ्यात पडले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करताना मुरलीधरन इतकं चांगलं नाचू शकतो याची कल्पनाच नव्हती असं म्हटलं. पण अखेर सत्य समोर आल्यानंतर त्यांची शंका दूर झाली आहे. 



किरण जोपले यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटला हा व्हिडीओ असून, त्यानुसार ते त्यांच्या विद्यार्थ्यांसह डान्स करत आहेत. या व्हिडीओत त्यांचे हावभाव, हास्य सगळं काही मुरलीधरन नाचतोय की काय असं वाटणारं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Kiran Jopale (@mr.kiranj)


तौबा तौबा गाण्याची कोरिओग्राफी बॉस्कोने (Bosco) केली आहे. हे गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर विकीला सर्व लक्ष मिळत असल्याने त्याने नाराजी जाहीर केली होती. त्यानंतर विकी कौशलनेही त्यावर प्रतिक्रिया दिली होती. बॉस्कोने गाण्याला प्रसिद्धी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पण हा ट्रेंड, प्रसिद्धी मिळत असताना कोरिओग्राफर्स दुर्लक्ष होत असल्याची नाराजीही त्याने बोलून दाखवली. तौबा तौबा गाणं व्हायरल होण्यामागे कोरिआग्राफर्सचीही तितकीच मेहनत असताना, त्यांची योग्य ती दखल घेतली जात नाही असं बॉस्कोने म्हटलं होतं. 


विकी कौशलनेही आपण बॉस्कोच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं होतं. कॅमेऱ्यामागे असणाऱ्यांना कॅमेऱ्यावर येणाऱ्यांइतकंच महत्त्व दिलं जावं असं त्याने म्हटलं आहे. स्टंट डायरेक्टरचा मुलगा असणारा विकीने चित्रपट बनवण्यासाठी अनेक लोक लागतात, त्यामुळे एकाच व्यक्तीला श्रेय मिळू नये असं विकी म्हणाला. 'तौबा तौबा' गाण्याला चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल विचारण्यात आलं असता विकीने सांगितलं की, "मी काय ती स्टेप माझ्या घरुन घेऊन गेलो नव्हतो. जी काही स्टेप केली ती बॉस्को सरांनी दिली".


"कॅमेऱ्यामागील कर्मचारी चित्रपटात काम करताना आनंदी असणं महत्त्वाचं आहे. ते ऊर्जा देण्याचं काम करत असतात. कधीकधी तुम्हाला वाटते की तुम्ही एक चांगला चित्रपट बनवला आहे, परंतु ते या लोकांच्या ऊर्जा, आशीर्वादामुळे होते. चित्रपटात कोणत्याही एका व्यक्तीची मेहनत नसते. हे टीमचं एकत्रित काम असतं," असं विकीने सांगितलं.