नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर भाषण केल्यानंतर यूपी गेट येथे आंदोलन करणाऱ्या भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी प्रतिर्रिया दिली आहे. फक्त एमएसपी वर कायदा करूनच देशातील शेतकऱ्यांना फायदा होईल. एमएसपीबाबत कोणताही कायदा नसल्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट होते. ते म्हणाले की, जेव्हा हे तीनही कृषी कायदे मागे घेतले जातील आणि एमएसपीवर कायदे मंजूर होतील तेव्हाच ही समस्या सुटेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते म्हणाले की, 'जे लोक उपासमारीवर व्यापार करतात त्यांना बाहेर काढलं जावं. जसे एका फ्लाइट तिकीटाची किंमत दिवसातून चार वेळा वाढते आणि कमी असते, त्याचप्रमाणे अन्नधान्याच्या किंमती भूक किती आधारे निश्चित होणार नाहीत. ते म्हणाले की, आजही ग्रामीण भागात दूध 22 ते 28 रुपये प्रतिलीटर दराने विकले जात आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च भागत नाही. यामुळे देशात जनावरांची संख्या कमी झाली आहे. जर जनावरे राहिली नाहीत तर जमीन ओसाड होईल.' ते म्हणाले की दुधाची किंमतही निश्चित केली पाहिजे. राजकीय पक्षांच्या पाठिंब्याबाबत राकेश टिकैट म्हणाले की, 'हे शेतकरी आंदोलन आहे, कोणत्याही राजकीय पक्षाचा तंबू नाही.'


सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण करताना सांगितले की एमएसपी होता, आहे आणि राहील. एवढेच नाही तर त्यांनी मंड्यांच्या आधुनिकीकरणाबाबतही भाष्य केलं आहे. पीएम मोदी यांनी विनंती केली आहे की शेतकर्‍यांनी त्यांचे धरणे प्रदर्शन संपवावे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करावी. ते पुढील चर्चेसाठी सज्ज आहेत. ते म्हणाले की, शेतकरी आंदोलन संपले पाहिजे आणि चर्चा चालूच राहिली पाहिजे.


राकेश टिकैत असेही म्हणाले की, 'दुधाच्या बाबतीतही आपल्या देशात परिस्थिती चांगली नाही. जर भविष्यात परिस्थिती तशीच राहिली तर परिस्थिती तुर्कीसारखी होईल आणि दुधही बाहेरून घ्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना आपलं पेन्शन सोडण्याच आवाहन केलं पाहिजे.'