नवी दिल्ली : शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्यामुळे केंद्र सरकार विरोधात देशभरातील शेतकरी संघटना आज दिल्लीत आंदोलन करणार आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे. 


४०० पेक्षा जास्त शेतकरी नेते आंदोलनात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आंदोलनात राजू शेट्टी, मेधा पाटकर, योगेंद्र यादव यांच्यासह 400हून अधिक शेतकरी नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तर लाखो शेतक-यांची आंदोलनात उपस्थिती असणार आहे. 


राजू शेट्टी यांची पायी रॅली


सकाळी 10 वाजता पहाडगंज येथील आंबेडकर भवन येथून राजू शेट्टी पायी रॅली काढणार आहेत. तर 11 वाजता रामलीला मैदानात आंदोलन होणार आहे. 


शेतकरी आणि संघटनेचे कार्यकर्ते दिल्लीत


रविवारी रात्रीच देशभरातून शेतकरी आणि संघटनेचे कार्यकर्ते दिल्लीत पोहचलेत. एकीकडे मूडीजने मोदींच्या कामकाजाचा आलेख उंचावल्याचे दाखविले असतानाच दूसरीकडे दिल्लीत देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलंय.