नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातून पुणतांबा येथून सुरुवात झाली. बघता बघता महाराष्ट्रात चांगलाच वणवा पेटला. आता या आंदोलनाची धार देशपातळीवर दिसणार आहे. ६ जुलैपासून  शेतकरी जनजागृती यात्रा काढण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी आणि शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी महाराष्ट्रातल्या पुणतांब्यातून पेटलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन आता देशपातळीवर पसरण्याचे संकेत मिळत आहे. दिल्लीत झालेल्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रीय पातळीवर शेतकरी जनजागृती यात्रा काढण्याची घोषणा करण्यात आली.  


मध्यप्रदेशातल्या मंदसौरमधून ६ जुलैपासून शेतकरी जागृती यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा समारोप २ ऑक्टोबरला चंपारणमध्ये करण्यात येणार आहे. सरकारने यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला नाही तर दुसऱ्या टप्प्यात उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणाही या बैठकीत करण्यात आली. देशभरातल्या तब्बल १३० शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी या बैठकीला उपस्थिती लावली होती.