नवी दिल्ली : नव्याने करण्यात आलेले कृषी कायदे रद्द (New Agriculture Laws) करण्याच्या मागणीसाठी गेले दोन महिने आंदोलन करणारे शेतकरी (Farmers ) आज प्रजास्ताक दिनानिमित्ताने (Republic Day) आक्रमक झाले आहेत. आज ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. दिल्लीच्या दिशेने कूच करण्याची शेतकरी आंदोलनकांनी तयारी केली आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आक्रमक  (Farmers Protest) झालेले दिसून आलेत. त्यांनी पोलिसांची बॅरिकेड्स तोडल्याने सीमेवर तणाव निर्माण झाला आहे.


देशव्यापी ट्रॅक्टर रॅलीचं दिल्लीत आयोजन




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकरी आज राजधानीत घुसणार असून ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, असे असताना पोलिसांची बॅरिकेड्स तोडल्याने तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे.



दिल्ली-हरियाणाच्या तिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांची पोलिसांनी सुरक्षेसाठी उभारलेले बॅरिकेड्स तोडले आहेत. हे शेतकरी पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समितीचे असल्याची माहिती आहे. संयुक्त किसान मोर्चाने अद्याप मोर्चासाठी सुरुवात केलेली नाही. दरम्यान दिल्लीच्या दिशेने निघालेल्या हजारो शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्टस तोडल्याने पोलिसांकडून त्यांना समजविण्यात येत आहे.