kisan credit card benefits: भारतातल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डची सेवा सुरु केली आहे. किसान क्रेडिट कार्ड लाभार्थी असलेल्यांसाठी आणि लाभार्थी नसलेल्यांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं खातं यूनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) आणि फेडरल बँकेमध्ये (Federal Bank) आहे त्यांच्यासाठी या बँकेकडून पायलट प्रोजेक्ट सुरु केला आहे. या प्रोजेक्टद्वारे, शेतकऱ्यांना बँकेकडून डिजिटल पद्धतीने केसीसी (kisan credit card) वाटप सेवा सुरु केलं आहे. शेती संदर्भातील कागदपत्रांच्या पडताळणीसाठी लागणारी अनिवार्य उपस्थिती गरजेची नसणार आहे असं बँकेने जाहीर केलं आहे.    


काय आहे पायलट प्रोजेक्ट?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पायलट प्रोजेक्टच्या (Pilot Project) माध्यमातून ग्रामीण भागातील बँकांचे डिजिटलायजेशन (Banking Digitalization) करण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रोजेक्टची सुरुवात रिझर्व बँकेने केली आहे. मध्यप्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील यूनियन बँक ऑफ इंडियाने (Union Bank of India) हा पायलट प्रोजेक्ट सुरु केला आहे. त्याचबरोबर, चेन्नईच्या फेडरल बँकेने (Federal Bank) देखील या प्रोजेक्टची सुरुवात केलीये. यूनियन बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रोजेक्ट संपूर्ण देशात लागू केला जाईल.


असा मिळणार फायदा...


बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी टेक्नोलॉजीसोबत स्वत: देखील अपडेट राहायला पाहिजे. पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून सुरु असलेल्या ऑनलाईन प्रक्रियामुळे शेतकरी घरबसल्या किसान क्रेडिट कार्डसाठी (KCC) अर्ज करु शकतो. सर्व प्रक्रिया ऑनलाईन (KCC Online Apply) असल्याने शेतकऱ्यांना कागदपत्राच्या पडताळणीसाठी बँकेत जाण्याची गरज पडणार नाही. या ऑनलाईन पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचेल आणि बँकेमध्ये होणारी गर्दी देखील यामुळे कमी होऊ शकते.