मध्य प्रदेशातील शेतकरी हैराण, एक रुपये किलोने विकावा लागतोय कांदा
संपूर्ण देशात शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांवर कर्जाचा भार आहे. तर काहींना हमीभाव मिळत नाहीये.
भोपाळ : संपूर्ण देशात शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांवर कर्जाचा भार आहे. तर काहींना हमीभाव मिळत नाहीये. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांवरही अशीच वेळ आलीये. यादरम्यान भोपाळच्या बाजारात शेतकऱ्यांची स्थिती खूपच वाईट आहे. शेतकऱ्यांना कांदा १ ते तीन रुपये किलोने विकला जातोय. एएनआयशी बोलताना शेतकऱ्यांनी ही स्थिती मांडली. आमच्याकडे पर्याय नाहीये. त्यामुळे आम्हाला कांदा भाजी बाजारात विकावा लागतोय.
शेतकऱ्यांचा चक्काजाम
व्यापाऱ्यांनी बाजारात कांद्याची विक्री सुरु केल्यानंतर कांद्याच्या दरात मोठी घरसण झाली. काही शेतकऱ्यांचा कांदा तर विक्रीही होत नाहीये. जर व्यापारी कांदा खरेदी करत आहेत तर बोली ५० पैशांपासून पुढे सुरु केली जातेय. यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांनी इंदूर रोडवर चक्काजाम केला.