नवी दिल्ली : दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅली आंदोलनाला गालबोट लागलंय. एक ट्रॅक्टरचालक पुढे सरसावला आणि त्याने आपला ट्रॅक्टर भरधाव वेगात थेट पोलिसांच्याच अंगावर घातला. त्यामुळे पोलिसांना ट्रॅक्टरपासून स्वतःचा बचाव करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. या आक्रमक ट्रॅक्टरचालकाला आवरणं पोलिसांना जिकिरीचं होऊन बसलं. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांनी लाल किल्ला परिसरात जोरदार राडा घातला आहे. दरम्यान यावेळी हिंसक झालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. मात्र हिंसक आंदोलकांनी पोलिसांवरही हल्ला चढवला. यात काही पोलिसा कर्मचारी जखमी झाले आहेत. 



दिल्लीत आक्रमक झालेल्या आंदोलक शेतकरी दिल्ली परिवहन सेवेच्या बसला टार्गेट केलं. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी या बसेस रस्त्यावर आडव्या उभ्या केल्या होत्या. पण दिल्ली परिवहनच्या बसला आंदोलकांनी ट्रॅक्टरने धडका दिल्या. आणि बसला धक्के देऊन आंदोलकांनी पलटी करायचा प्रयत्न केला. 


यावेळी पोलिसांना केवळ बघ्याची भूमिका घेण्यापलिकडे दुसरं काहीच करता आलं नाही. मोठ्या संख्येतल्या आक्रमक झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांपुढे दिल्ली पोलीस हतबल झालेले दिसत होते.