नवी दिल्ली : शेतकऱ्यांचं कालचं रौद्र रुप संपूर्ण देशाने पाहिलं. प्रजासत्ताक दिनी लालकिल्ल्यात घुसून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. नुसतं आंदोलनच नाही तर संतप्त शेतकऱ्यांनी लालकिल्ल्याची धासधुसही केली. किसान मोर्चाच्या नावाखाली शेतकरी संघटनांनी जोरदार धिंगाणा काल दिवसभर राजधानी दिल्लीत घातला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लालकिल्ल्यावर आंदोलकांनी हल्लाबोल केल्यावर तिथे तैनात दिल्ली पोलिसांवर आंदोलकांनी तलवारी आणि दांडपट्टे घेऊन जोरदार हल्ला केला. अवघ्या 40 सेकंदात तब्बल 21 पोलीस किल्ल्याच्या भिंतीवरून 20 ते 25 फूट खोल खाली कोसळले. काही पोलिसांनी उड्या मारण्याचा प्रयत्न केला तर काही पोलीस खाली कोसळले. 



या दंगेखोरांच्या हाती लाठ्या, तलवारी होत्या. सुरक्षा कर्मचाऱ्यांवर जोरदार लाठीहल्ला या आंदोलकांनी केला होता. आंदोलकांच्या संख्येपुढे पोलिसांची संख्या अगदीच कमी होती. त्यात अत्यंत आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पोलिसांवर जोरदार हल्ला केला. 


हाती शस्त्र असूनही केवळ परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी शस्त्राचा वापर केला नाही. मात्र आंदोलकांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यामुळे पोलिसांनी माघार घेतली यात पोलीस अक्षरशः खाली कोसळले.