Farmers Protest : केंद्र सरकारच्या जेवणावर शेतकऱ्यांचा बहिष्कार
कृषी कायद्याविरोधात (New Farm Laws) शेतकरी आणि केंद्र सरकार बैठकीत अजूनही तोडगा निघालेला नाही.
नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधात (New Farm Laws) शेतकरी आणि केंद्र सरकार बैठकीत अजूनही तोडगा निघालेला नाही. केंद्र सरकारच्या जेवणावर शेतकऱ्यांचा बहिष्कार टाकला (Farmers boycott central government meals) आहे. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावर ( Farmers Protest ) तोडगा काढण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. आज झालेल्या शेतकऱ्यांसोबतच्या चौथ्या फेरीतही तोडगा काढण्यात अपयश आले. नवा कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असल्यामुळे हा तिढा वाढतच चाललाय. शेतकरी आंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे.
प्रकाशसिंह बादल यांनी परत केला पद्म विभूषण
दिल्लीतील विज्ञान भवनात सरकार आणि शेतक-यांची बैठक झाली. या बैठकीत एकूण ४० शेतकरी संघटना सहभागी झाल्या होत्या. तसंच कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि पियूष गोयल बैठकीला उपस्थित होते. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शाह आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यातही चर्चा झाली. शेतकरी नेत्यांनी सरकारच्या जेवणावर बहिष्कार घातलाय. सरकारने शेतकरी संघटना नेत्यांना दुपारच्या जेवणाचे आयोजन केले होते. मात्र या शेतकऱ्यांनी सरकारचे जेवण नाकारुन सोबत आणलेलं लंगरचे जेवणच घेतले.
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता पुरस्कार वापसी सुरू झालीय. प्रकाश सिंह बादल यांनी पद्मविभूषण परत केला. प्रकाश सिंह बादल यांनी राष्ट्रवादी रामनाथ कोविंद यांना तीन पानांचे पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी कृषी कायद्याला विरोध म्हणून पुरस्कार परत करत असल्याचे म्हटले आहे.