नवी दिल्ली : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत शेतकरी नेत्यांची आज चर्चा झाली. ही चर्चा ३ तास चालली पण चर्चा निष्फळ ठरल्याचं शेतकरी नेत्यांच्या प्रतिक्रियेवरुन दिसून येत आहे.  शेतीविषयक कायदे रद्द करण्यास सरकारने नकार दिला असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय संशोधन संस्था येथे ही चर्चा झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह १३ नेत्यांचा या चर्चेत समावेश आहे. पाच दिवसांपासून चर्चा सुरु आहे. पण सरकार अजूनही आपली भूमिका बदलण्यास तयार नसल्याचं शेतकरी नेत्यांनी म्हटलं आहे.


ही चर्चा निष्फळ ठरत असल्याचं या नेत्यांनी म्हटलं आहे. तसेच उद्या या चर्चेची आणखी एखादी फेरी होईल का? यावर शेतकरी नेत्यांनी म्हटलं आहे, आता कोणतीही चर्चा होईल बैठक होईल अशी शक्यता नाही. बैठकीतून शेतकरी नेते बाहेर आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली. सरकारकडून या बैठकीवर तसेच एकूण शेतीविषयक कायद्यांवर उद्या काही स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे.


केंद्र सरकार कोरोना लसीकरणाच्या तयारीला लागलंय. यासाठी केंद्र सरकार नवीन अॅप आणणार आहे. या अॅपवर लसीबाबत नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलंय. कोविन असं या अॅपचं नाव असेल अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलीय. या अॅपवर संपूर्ण माहिती अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर संबंधितांना लसीकरण करण्यात येणार आहे. 



दरम्यान भारत बंद आंदोलन देशभरात यशस्वी झाल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे, तसेच मागण्या पूर्ण होईपर्यंत आपलं आंदोलन सुरुच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.