नवी दिल्ली : केंद्र सरकारने कृषी कायदे (Farm Laws)  रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांची २१ व्या दिवशी आंदोलन सुरु आहे. मात्र, शेतकरी आंदोलनच्या समर्थनात संत बाबा राम सिंह  (Baba Ran Singh) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. दिल्ली-हरियाणा बॉर्डर (Singhu border) आंदोलन सुरु आहे. शेतकरी आंदोलनच्या ( Farmers Protest) च्या समर्थनात संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर गोळी झाडली. गाडीत बसून पिस्तुल रोखून गोळी झाडून घेतली. सिंधु बॉर्डरवर ते शेतकऱ्यांनी कंबल वाटण्यासाठी आले होते.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 जयपूर - दिल्ली महामार्गावर (Jaipur-Delhi Highway) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यावेळी बाबा राम सिंह यांनी स्वतःवर गोळी झाडून घेण्याआधी सुसाइड नोट लिहिली. यात बाबा राम सिंह (Baba Ran Singh) यांनी लिहिले आहे की, शेतकऱ्यांच्या वेदन पाहवत नाहीत. तसेच अन्याय सहन करणे हेही पाप आहे. हे पाहणेही पाप आहे आणि हे सर्व सहन होत नाही आणि सहन करणेही पाप आहे. मी शेतकऱ्यांना सांगतो, ही स्थिती पाहवत नाही. 



सुसाइड नोटमध्ये पुढे लिहिलेले आहे, 'काहींनी शेतकऱ्यांचे हक्क आणि जुल्म यांच्याविरोधात आपले सम्मान प्राप्त पुरस्कार परत केले आहेत. आज शेतकरी हक्कासाठी आणि सरकारच्या अन्यायाच्याविरोधात मी आत्महत्या करत आहे. हा अन्यायाविरोधात आवाज आहे. शेतकऱ्याच्या हक्कासाठी मी हा आवाज आहे. 'वाहेगुरु जी का खालसा ते वाहेगुरु जी की फतेह.'


 या शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अनेक शेतकरी आंदोलन करत आहे. आज एका शेतकऱ्यांने आपले बलिदान दिले आहे. मोदी सरकारच्या क्रौर्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हटवादीपणा सोडून द्या आणि कृषी-विरोधी कायदा त्वरित मागे घ्या, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.


शेतकऱ्याची दिल्लीच्या सीमेवर शेतकरी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता अधिक आहे. जोपर्यंत कायदे मागे घेणार नाही तो पर्यंत माघार नाही, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिले, पण पूर्ण केलेले नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत, असे शेतकऱ्यांनी सांगितले. गाझीपूर सीमेवर निम लष्करी दलाचे जवान मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आले आहेत. शेतकरी आंदोलनानं उग्र रूप धारण केले तर राजधानी बंद होऊ नये याची काळजी घेतली जात आहे.