मुंबई : Kisan Credit Card Loan Scheme : शेतकऱ्यांसाठी (Farmer) आनंदाची बातमी. आता पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून क्रेडीट कार्ड मिळणार आहे.(Credit Card Loan)  याच्यामाध्यमातून शेतकरी बँकेत न जाता थेट कर्ज मिळवू शकतो. त्यामुळे बँकेच्या कटकटीतून मुक्तता मिळणार आहे. (Farmers will get credit cards from the central government for crop loans)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांना हे कार्ड मिळेल. या कार्डची मुदत तीन वर्षांची असेल. या कर्डवरुन शेतकऱ्यांना दोनवेळा कर्ज घेता येईल. क्रेडीट कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वित्तसंस्थांमध्ये जागेच्या  सातबारा उताऱ्याची माहिती द्यावी लागणार आहे.


 या कार्डमध्ये शेतकऱ्याच्या शेतीची सविस्तर नोंद असणार आहे. त्याने मागील वर्षी कोणते पीक घेतले. किती कर्ज घेतले, त्यातील किती फेडले तसेच किती बाकी आहे. नव्याने कोणते पीक घ्यायचे आहे. याची माहिती या कार्डमध्ये असणार आहे. तर शेतकऱ्याच्या कर्जाची पीकनिहाय वार्षिक मर्यादा त्यावरुन ठरेल. तेवढ्या मर्यादेचे कर्ज त्याला कार्ड दाखवले की मिळणार आहे.


जेवढी मर्यादा आहे त्याचे दोन विभाग करुन एका वर्षात त्याला दोन वेळा कर्ज घेता येईल. दरम्यान, मागील कर्ज फेडली की त्याला पुढील वर्षी कर्ज मिळू  शकणार आहे.