निवडणूक प्रचारात फारूख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त वक्तव्य
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी पुन्हा खळबळजनक विधान केले आहे.
जम्मू काश्मीर : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी पुन्हा खळबळजनक विधान केले आहे. जम्मू काश्मीर सन्मानाने भारतात राहणार की नाही याचा फैसला २०१९ च्या निवडणुकांचे निकाल करतील असे अब्दुल्ला म्हणाले. ते श्रीनगमधून अब्दुल्ला निवडणूक लढत आहेत. धर्मनिरपेक्षता, एकता यासाठी लोकांनी मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. आपली ओळख जपण्यासाठी आपली थेट लढत भाजपाशी आहे असे अब्दुल्ला म्हणाले. शेजारी राष्ट्राशी सौहार्दपूर्ण वातावरणात आपण राहू शकू का याचा निर्णय या निवडणुका करतील असे अब्दुल्ला म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वच पातळ्यांवर अपयशी झाल्याची टीका त्यांनी केली.
जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा धोक्यात आहे असेही नॅशनल काँफरंसचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला म्हणाले. 2020 पर्यंत राज्याची सांविधानिक सुरक्षा संपणवण्याचा हेतू समजल्याची टीका त्यांनी भाजपावर केली आहे. अनंतनागच्या डाक बंगला येथे निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. मागच्या पीडीपी-भाजपा सरकारने राज्यात अराजकता पसरवल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.