fashion tips : काही फॅशन ट्रेंड (fashion style trending) हे कधीच आउट होत नाहीत नवीन टच देऊन काही जुनेच ट्रेंड पुन्हा नव्याने स्टाईल केले जातात सुंदर दिसावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं यासाठी आपण छान कपडे असो किंवा स्किनकेअर सर्वाचीच खूप काळजी घेतो मात्र सर्वात महत्वाचा भाग म्हणजे फॅशन सेन्स ! तुम्ही कोणताही आऊटफिट घाला मात्र त्यात तुम्ही स्वतः  कंफर्टेबल (comfortable outfit fashion) असाल तर चारचौघात उठून दिसाल आणखी महत्वाचं म्हणजे कोणताही outfit असो तुम्ही व्यवस्थित स्टाईल केलात तर प्रश्नच नाही .... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला तर मग आज जाणून घेऊया पोलका डॉट प्रिंट कशा प्रकारे कॅरी करता येईल 


पोलका डॉटना 'बॉबी प्रिंट' सुद्धा म्हटलं जात कारण बॉबी सिनेमात (bobby movie , bobby dress) डिम्पल कपाडियांनी (dimple kapadia) पोलका डॉट प्रिंटेड (polka dot print) ड्रेस घालून त्यावेळी सर्वाना मोहून टाकलं होत आजही बरेच जण पोलका डॉट प्रिंटला पसंती देतात 


पोलका डॉट प्रिंटमध्ये बऱ्याच स्टाईल आहेत पण बऱ्याचदा हे मोठे पोलका डॉट्स आणि  स्मॉल प्रिंट मध्ये अव्हेलेबल असतात . (fashion tips polka dot fancy dress outfit ideas to look fashinable)


पोलका डॉट जम्पसूट किंवा ओव्हरऑल ड्रेस


क्लासिक ब्लॅक अँड व्हाईट पोलका डॉट तुम्हाला ऑल टाइम रॉकिंग लुक देण्यासाठी बेस्ट आहे या प्रकारात तुम्ही जम्पसूट (jumpsuit)  किंवा फुल्ल ड्रेस (long dres) ट्राय करू शकता यासोबत एक बेल्ट आणि लॉन्ग हॅन्डबॅग (handbag designs) कॅरी केलीत तर खूप सुंदर लुक येईल 


ट्राय करा वेगळे प्रिंट्स 


पोलका डॉटमध्ये तुम्ही वेगवेगळे प्रिंट्स पेअर ट्राय करू शकता याला कलर ब्लॉकिंग (color blocking) म्हणतात या प्रकारात तुम्ही स्मॉल प्रिंट सोबत बिग पोलका डॉट प्रिंट एकत्र पेअर करून एकदम हटके लुक देऊ शकता 


पोलका डॉट स्टाईलला आणखी हटके लुक द्यायचा असेल तर तुम्ही दोन वेगवेगळ्या रंगासोबत मिसमॅच किंवा काँट्रास्टमध्ये (mismatch, contrast color) जाऊ शकता .यात तुम्ही सफेद रंगाच्या पोलका डॉट शर्टसोबत ब्लॅक रंगाचा पोलका डॉट स्कर्ट किंवा पॅन्ट मॅच करून पार्टी लुक करू शकता  (fashion tips polka dot fancy dress outfit ideas to look fashinable )


या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा 


1- जर तुम्ही उंचीने लहान असाल तर नेहमी स्मॉल पोलका डॉट प्रिंट निवडा 



2- जर पोलका डॉट शर्ट घालणार असाल तर प्लेन किंवा सॉलिड बॉटम  निवडू शकता 



3- पोलका डॉट प्रिंट तुम्ही मॅचिंग ट्राउजर किंवा बॉटम सोबत घालू शकता 



4- तुम्ही पोलका डॉट स्कार्फ किंवा स्टोल घेऊन लुक आणखी स्टायलिश करू शकता