नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गांवर आजपासून फास्टटॅग सुरू होत आहेत. सर्व वाहनांना फास्टटॅग असणं अनिवार्य असणार आहे. विना फास्टटॅग वाहनांनी फास्टटॅग मार्गिकेचा वापर केला तर वाहनांना दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे. देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवर टोलनाक्यांवर फास्टटॅग लेन सुरू होणार आहे. या योजनेमुळे टोलनाक्यातून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस आणि झटपट होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवातीला टोल नाक्यांवरील ७५ टक्के मार्गिकांवरच ही योजना असेल, तर उर्वरित मार्गिकांवर टोल भरण्यासाठी रोख रक्कमेची सुविधा असणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. 


वाहनावर फास्टटॅग बसवण्यात आल्यानंतर टोलनाक्यावर येताच तेथील सुसज्ज अशा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशनद्वारे टोलनाक्यांवर बसवण्यात आलेले सेन्सर वाहनावरील टॅग वाचेल व टोलचे पैसे वाहनधारकाच्या खात्यातून जातील. पैसे खात्यातूच जाताच वाहनधारकाला नोंदणी असलेल्या मोबाइल क्रमांकावर त्याची माहिती मिळेल.


लवकरच टोलनाके होणार Cash Free


काय होणार फायदा


फास्टटॅग लावलेल्या वाहनांना टोलच्या रांगेत थांबण्याची गरज राहणार नाही.  फास्टटॅगचे विशिष्ट अकाऊंट तयार असेल त्यातून टोलचे पैसे आपोआप कट होणार आहेत. तसेच टोलनाक्यावर वाहनाची ओळखही होणार आहे. यातील रक्कम संपल्यानंतर  फास्टटॅगला पुन्हा रिचार्ज करावा लागणार आहे. टोल प्लाझावरच्या लांबच लांब रांगांमधून सुटका होणार आहे.