लवकरच टोलनाके होणार Cash Free

उचललं जात आहे हे महत्त्वाचं पाऊल 

Updated: Nov 21, 2019, 05:13 PM IST
लवकरच टोलनाके होणार Cash Free  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली :  देशात १ डिसेंबरपासून टोल नाक्यांवरून जात असताना फास्ट टॅग आवश्यक असेल. प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी नोडल अधिकारीही तैनात आहेत. देशभरातल्या २८ हजार पाचशे विक्री केंद्रांवर फास्ट टॅग उपलब्ध असेल. राष्ट्रीय राजमार्गाच्या सर्व टोल नाके, आरटीओ, बँक आणि काही पेट्रोल पंपांवर हे फास्ट् टॅग तयार होतील. अॅमेझॉन, एसबीआय आणि अॅक्सिस बँकेच्या ऑनलाईन वेबसाईटवरही फास्ट टॅग उपलब्ध असतील.

देशात इलेक्ट्रॉनिक टोलला प्रोत्साहन देण्यासाठी १ डिसेंबरपासून सर्व राष्ट्रीय महामार्गावर फास्ट टॅग म्हणजेच आरएफआयडी RFID सक्तीचा करण्यात येणार आहे. 

काय आहे RFID म्हणजेच फास्ट टॅग? 

RFID म्हणजेच रे़डिओ फ्रिक्वेन्सी इन्फ्रारेड डिव्हाइस ही एक लहानशी चीप किंवा एक स्टीकर असतो. जो वाहनाच्या पुढच्या काचेला लावण्यात येतो. याच चीप/ स्टीकरला फास्ट टॅग असं म्हणतात. 

फास्ट टॅग लावलेलं वाहन जेव्हा कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या टोल नाक्यावरुन जाईल तेव्हा हाय डेफिनेशन कॅमेरा तुमच्या वाहनावर लावण्यात आलेला तो स्टीकर स्कॅन करेल ज्यामुळे तुमच्या वाहनाचा टोल हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरण्यात येईल. 

जर, ते वाहन २४ तासांमध्ये पुन्हा एकदा त्या टोल नाक्यावरुन परत येत आहे, तर त्याच्याकडून कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. येत्या काळात सरव् नव्या वाहनांवर हे टॅग लावलेले असणार आहेत. तर, जुन्या वाहनांसाठी हे टॅग खरेदी करावे लागणार आहेत. 

कसा तयार होणार RFID? 

RFID कोणत्याही बँकेत तयार केला जाऊ शकतो. १ डिसेंबरपासून सर्व टोलनाके कॅशलेस होणार असल्यामुळे या परिस्थितीमध्ये टोल नाक्यांवर बँक कर्मचारी रुजू करण्यात येणार असून, वाहन चालकांना तेथूनच ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. ज्याकरता वाहन चालकांना त्यांची आरसी, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रांची फोटोस्टेट प्रत सोबत बाळगावी लागणार आहे.

रिचार्ज ऍक्टिवेट करण्यासाठी... 

मोबाईलवर My Fast Tag हे ऍप डाऊनलोड करुन सर्वप्रथम फास्ट टॅगला या ऍपशी लिंक करा/ जोडून घ्या. पुढे UPI किंवा बँक खात्याच्या माध्यमातून तुम्ही मोबाईल ऍपच्याच माध्यमातून फास्ट टॅगला रिचार्ज करु शकता.