Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा (Agra) येथे एका निर्घृण हत्याकांडामुळे (Murder) खळबळ उडाली आहे. सासऱ्यानेच आपल्या सूनेची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या केली आहे. सासऱ्याने कुऱ्हाडीने वार करत सुनेचं शीर धडापासून वेगळं केलं. यानंतर आरोपी सासऱ्याने पोलीस स्टेशन गाठलं आणि आत्मसमर्पण केलं. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळ गाठलं आणि मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, भीतीचं वातावरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रघुवीर सिंह असं आरोपी सासऱ्याचं नाव आहे. आरोपीने पोलिसांना सांगतिलं की, त्याला दोन सुना असून त्यांच्यात नेहमी भांडणं होत होती. आपण त्यांची भांडणं सोडवण्यासाठी गेलो असता छोटी सून प्रियंकाने आपल्याला लाथ मारली होती. यानंतर मी फार व्यथित झालो होतो. मला रात्रभर झोपत लागली नाही. याच रागात मी सकाळी उठलो आणि कुऱ्हाड हाती घेत छोट्या सूनेवर हल्ला केला. मी तिच्या मानेवर वार करत तिचं मुंडकं शरिरापासून वेगळं केलं. 



मिळालेल्या माहितीनुसार, मलिकपूरचे निवासी असणारे आरोपी रघुवीर सिंह 62 वर्षांचे आहेत. त्यांनी दोन मुलं आहेत. यामधील एक मुलगा गौरव पोलिसात कॉन्स्टेबल पदावर आहे. दोन्ही मुलांची लग्नं मथुरा जिल्ह्यातील दोन सख्ख्या बहिणी संगीता आणि प्रियंका यांच्याशी केलं होतं. 4 वर्षांपूर्वी संगीताचा मृत्यू झाला होता. यानंतर तिचा पती सौऱभ याने दुसऱ्या महिलेशी लग्न केलं होतं. जवळपास दीड वर्षांपूर्वी सौरभचा मृत्यू झाला होता. मृत प्रियंकाला दोन मुलं आहेत. 5 वर्षांची मुलगी ख्वाहिश आणि दीड वर्षांचा मुलगा गोलू अशी त्यांची नावं आहेत.


डीसीपी सोनम कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, " कौटुंबिक वादातून सासऱ्याने आपल्या 26 वर्षीय सूनेची हत्या केली आहे. पीडिता स्वयंपाक करत असताना आरोपीने मागून तिच्यावर हल्ला केला. आरोपीला अटक करण्यात आलं आहे. मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जात आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे".


आरोपीला अटक


आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.  कोर्टात हजर केलं असता, त्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, मृत सूनेचा पती गौरव याला पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर धक्का बसला आहे. तो सध्या उत्तर प्रदेश पोलीस दलात कार्यरत आहे.