Crime News : वडील आणि मुलीचं नातं जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र नातं असतं. प्रत्येक वडिलांना आपली लेक आणि लेकी आपले वडील अतिशय प्रिय असतात. पण या नात्याला काळीमा फासणारी बातमी समोर आली आहे. एका नराधम बापाने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिने हे कोणाला सांगून नये म्हणून धमकी द्यायचा. त्यानंतर तो वारंवार तिचं शोषण करायचा.एवढंच नाही तर या नराधम बापाने मुलीसोबत घृणास्पद कृत्य करतानाचे व्हिडीओदेखील काढले. मुलीच्या आईला अखेर या घटनेची माहिती मिळाली त्यानंतर तिने पोलीस स्टेशन गाठून नवऱ्याबद्दल तक्रार दाखल केली. हा नराधम त्या मुलीचा सावत्र बाप आहे. (father misdeeds step daughter and makes obscene video firozabad man arrested Crime News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईलमधील या घटनेचा व्हिडीओ पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. पोलीस त्या नराधमाला पकडण्यासाठी गेले असताना तो पळण्याचा प्रयत्नात होतात. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो रस्त्यावरुन पळत असताना एका वाहनाने त्याला धडक दिली ज्यात तो जखमी झाला आहे. 


मिळालेल्या माहितीनुासर फिरोजाबादमधील दक्षिण भागातील पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी दुपारी एक महिला आली. तिने सांगितलं मी राजू नावाच्या व्यक्तीसोबत दुसरं लग्न केलं. मला पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगी आहे. दुसऱ्या लग्नानंतर माझा नवरा सावत्र मुलीवर वाईट नजरेने बघायचा. अनेकदा समजावून सांगितल्यावरही तो काही ऐकत नव्हता. 


एकदा मुलगी घरात त्याला एकट्यात सापडली तेव्हा त्याने तिच्यावर बलात्कार केला. ती अल्पवयीन असून तिचं वय 16 आहे. त्यानंतरही तो तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करत होता. जर मुलीने आणि आईने विरोध केल्यास तो त्यांना बेदम मारहाण करायचा. 


महिलेने तिच्या मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ आणि फोटोही पोलिसांना दाखवले. या व्हिडीओ आणि फोटोच्या आधारे पोलिसांनी नराधम बापाविरोधात बलात्काराचा एफआयआर नोंदवला आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजता पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला जेव्हा तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना हिमायूनपूर चौकाजवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिल्याने तो जखमी झाला. पोलिसांनी त्याला शासकीय ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी नेलं होतं.  प्राथमिक उपचारानंतर त्यांना खासगी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.  आरोपीच्या तोंडाला, हाताला आणि पायाला दुखापत झाल्याचं, सीओ सिटी यांनी सांगितले.