Extra Marital Affairs News: प्रेमात पडण्याचे कोणतेही वय नसते किंवा प्रेमात माणूस आंधळा (Love Affair News) होतो, असं म्हटलं जातं. तसाच काहीसा प्रकार बिहारमध्ये (Bihar) घडला आहे. हल्ली बिघडलेल्या नातेसंबंधांमुळं गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंध, एकतर्फी प्रेमप्रकरणामुळं गुन्हे घडत असल्याचं उघड झालं आहे. बिहारची राजधानी पटनामध्ये चक्रावणारा प्रकार समोर आला आहे. 


सहा मुलींना आणि बायकोला सोडून फरार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या वयात वडिलांनी मुलीच्या लग्नाची तयारी करायची असते त्या वयात या व्यक्तीने बायको-मुलांना सोडून स्वतःच्याच लग्नाची तयारी केली आहे. आपल्या सहा मुली आणि पत्नीला सोडून एक व्यक्ती मेहुण्याच्या बायकोसोबत फरार झाला आहे. घटना समोर आल्यानंतर महिलेच्या पतीने पोलिस ठाण्यात बायको पळून गेल्याची तक्रार दाखल केली आहे. तर, महिलेनेही तिचा पती फरार झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. मात्र, पोलिसांनी ही कौटुंबिक बाब असल्याचे सांगत हात वर केले आहेत. 


लग्नाला झाली होती 20 वर्षे


घटनेची अधिक माहिती अशी की, चिंता देवी (35) नावाच्या महिलेचे 20 वर्षांपूर्वी राजशेखर उर्फ शिवजन्म पासवानसोबत झालं होतं. लग्नानंतर दोघांनाही सहा मुली आहेत. चिंता देवीचा मुलगा मनरेगामध्ये कामाला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याचे वागणे बदलले आहे. 


दुसऱ्या महिलेसोबत अफेअर


पतीचे त्याच्याच मेहुण्याच्या पत्नीसोबत अफेअर सुरु असल्याचे पत्नीला कळले. तिन् याबाबत विचारणा केली असता त्याने तिला व सहा मुलींना माराहण केली व घरातून बाहेर काढले. पतीने घराबाहेर काढल्यानंतर ती मुलींसह माहेरी आली. या घटनेनंतर चिंतादेवीने पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराअतर्गंत तक्रार दाखल केली आहे. 


पोलिसांत तक्रार दाखल


चिंता देवीने म्हटलं आहे की, तिच्या मुली आता लग्नाच्या वयाच्या झाल्या आहेत. मात्र, तरीही पती त्यांच्याशी नीट वागत नाही. त्यांना घाणेरड्या शिव्या देतो. दरम्यान, जिच्यासोबत तो फरार झाला आहे तीदेखील चार मुलांची आई आहे. तिच्या पतीनेही तिच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुरुवातीला पोलिसांनी तक्रार लिहून घेण्यास टाळाटाळ केली. मात्र, महिलेने माघार घेतली नाही. पोलिस तक्रार दाखल करेपर्यंत ती तिथेच बसून राहिली होती. अखेर पोलिसांनी तिचा पती फरार झाल्याची तक्रार नोंद करुन घेतली आहे.