इंदुर : स्वत:च्या 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा धक्कादायक प्रकार इंदूरमध्ये उघडकीस आला. इंदूर जिल्हा न्यायालयाने आरोपी बापाला मरेपर्यंत तुरुंगवास देण्याची शिक्षा सुनावली आहे. पित्याच्या दुष्कृत्यामुळे गर्भवती झालेल्या मुलीला जबरदस्ती बाळाला जन्म द्यावा लागला आणि तिच्या अभ्यासाचंही नुकसान झाल आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्षा शर्मा यांनी याप्रकरणी मंगलसिंह पवार (38) वर लैंगिक शोषण आणि बालहक्क संरक्षण कायद्याअंतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आरोपी आपल्या वासनेमध्ये इतका बुडाला होता की त्याला स्वत:च्या मुलीवर बलात्कार करतोय याचेही भान राहिले नाही. ज्या मुलीला आपण बोट पकडून चालायला शिकवलय तिलाच वासनेचे बळी करत असल्याचेही त्याला समजत नव्हते', अशी टीप्पणी कोर्टाने आपल्या निर्णयादरम्यान केली. 


मुलीला भरपाई 


आरोपीला शेवटच्या श्वासापर्यंत तुरूंगवासाची शिक्षा ठोठावत 50 हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आलाय. ही रक्कम पिडित मुलीला भरपाई म्हणून देण्यात यावी असेही सांगण्यात आले. 'घरी सर्व झोपल्यावर वडील बलात्कार करायचे', असे मुलीने न्यायालयात सांगितले. 


गर्भपाताची परवानगी नाही 


मार्च महिन्यात मुलीच्या पोटात दुखू लागल्याचे तिने आईला सांगितले. आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली. तपासादरम्यान मुलगी सहा महिन्याची गर्भवती असल्याचे समजले. डॉक्टरांनी मुलीला गर्भपात करण्याची परवानगी दिली नाही कारण यामुळे तिच्या जिवाला धोका झाला असता. 


आईला उच्च रक्त दाबाचा त्रास असल्याने मुलीने याबद्दल काही सांगितले नाही. हे प्रकरण समोर आल्यानंतर मार्चमध्ये मुलीने जवळच्या आझाद नगर पोलिसात यासंबधी तक्रार दाखल केली होती.