FCI Assistant Exam Phase I Result 2023: सध्याचा सिझन आहे तो म्हणजे (Hiring Process in India) नोकरभरतीचा. मार्च - एप्रिल मध्ये पदवीला किंवा पद्यूत्तर शिक्षण (Graduation and Post - Graduation Students) घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपायला येतात आणि त्यामुळे तेही नोकरीच्या शोधात असतात. त्यातून आता शिक्षण क्षेत्रातही (Education Sector) मोठे बदल होताना पाहायला मिळत आहेत. शिक्षण क्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत त्यातून या संधीचा चांगला वापर ते करून घेऊ शकतात. त्यातील एक क्षेत्र आहे ते म्हणजे खाद्यक्षेत्र. या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे अनेकांचा कल आता या क्षेत्रातील संशोधनातही वाढू लागली आहे. (FCI Grade 3 Phase 1 Results has been declared by food corporation of India how to download scorecard)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय खाद्य निगम (Food Corporation of India) ही अशीच एक संस्था आहे जी अशा अनेक संशोधकांना आणि या क्षेत्रात काम करणाऱ्यांना संधी देते. त्यांच्या वेबसाईटवर (FCI Website) अनेक प्रकारच्या नोकरीच्या जाहिरातीही येत असतात. फेब्रुवारी मार्च महिन्यातही भारतीय खाद्य निगममध्ये भरती (Food Corporation Of India Limited) केली जाते. सध्या या संस्थेद्वारे झालेल्या परीक्षांचे निकाल लागले असून त्या निकालाच स्कॉर कार्ड ते संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकतात. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की, तुम्ही स्कोअर कार्ड कसं आणि कुठून डाऊनलोड करू शकतो आणि याचा निकाल नक्की लागणार तरी कधी आहे? 


काय आहे लेटेस्ट अपडेट? 


समोर आलेल्या अपडेटनुसार, भारतीय खाद्य निगमच्या असिसंस्टच्या फेस 1 (FCI Assitant Phase I) च्या परीक्षांचे निकाल लागले आहेत तर त्यांच्या फेस 3 चे निकाल लवकरच लागणार आहेत. त्यामुळे फेस 3 (FCI Assitant Phase 3) चे निकाल पाहण्यासाठी तुम्हाला खोडीशी वाट पाहावी लागणार आहे. यासोबत भारतीय खाद्य निगमाद्वारे असिस्टंटच्या होणाऱ्या फेस 2 (FCI Assitant Phase 2 Admit Cards) परीक्षांचे अडमिट कार्डही लवकरच समोर येणार आहेत. भारतीय खाद्य निगमद्वारे आज, फेब्रुवारी 28, परीक्षांचे निकाल घोषित झाले आहेत. fci.gov.in या संकेतस्थळाववरून तुमचे स्कोअर कार्ड तुम्ही डाऊनलोड (How to Download FCI Assistant Phase I Download) करू शकता. 


कसा पाहाल निकाल? असं करा स्कोअर कार्ड डाऊनलोड


fci.gov.in या संकेतस्थळावर जा. त्यानंतर होमपेजला जाऊन FCI Grade 3 Phase I Exam Results 2023 या लिंकवर जा. त्यात तुम्हाला एक छोटासा फॉर्म भरावा लागेल त्यात रोल नंबर आणि जन्मतारीख लिहावी लागेल. त्यानंतर हे सर्व सबमिट करा आणि मग तुमचा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल. यातून तुम्ही तुमचा निकाल डाऊनलोड करू शकतो.