नवी दिल्ली : जर तुम्ही फिक्स्ड डिपॉजिटमध्ये (FD) पैसे गुंतवत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. एफडी करण्याआधी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. रिझर्व बॅंकेने (RBI) एफडीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

RBI ने फिक्स्ड डिपॉजिटच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता मॅच्योरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही परताव्याची रक्कम क्लेम केली नाही तर, त्यावर मिळणारे व्याज कमी होऊ शकते. हे व्याज सेविंग अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याजाइतके असेल. सर्वसाधारणपणे 5 ते 10 वर्षाच्या दीर्घ अवधीसाठी एफडीवर 5 टक्क्यांच्या आसपास व्याज मिळतो. तर सेविंग अकाऊंटवर व्याज दर 3 ते 4 टक्क्यांच्या आसपास असते.


जाणून घ्या नवीन नियम
तुम्ही जर 5 वर्ष मॅच्योरिटी असलेल्या एफडीमध्ये पैसे गुंतवले असतील आणि ती आज मॅच्योअर होणार असेल. तरीही तुम्ही पैसे काढण्यासाठी क्लेम केला नाही. तर अशा परिस्थितीत सेविंग अकाऊंटप्रमाणे व्याज मिळत राहिल. त्यामुळे एफडी मॅच्योअर झाल्यास लगेच क्लेम करा अन्यथा तेथून पुढच्या कालावधीचे व्याज सेविंग अकाऊंटप्रमाणे सुरू होईल.


याआधी एफडी मॅच्योअर झाल्यानंतरही तुम्ही पैसे काढण्यासाठी क्लेम केला नसेल तर,  तेवढ्याच अवधीसाठी ती पुढे वाढवली जात असे. आणि  तोच व्याजदर देखील मिळत असे. 


त्यामुळे यापुढे एफडी मॅच्योअर झाल्यावर लगेच क्लेम करा अन्यथा तुम्हाला व्याज कमी मिळू शकते.