मुंबई : सेंसेक्सने आपल्या इतिहासात पहिल्यांदाच 60300 चा आकडा पार केला. सेंसेक्सने 50 हजाराहून 60 हजार अंकांपर्यंतची मजल फक्त 245 दिवसात मारली आहे. तसेच निफ्टीनेही 18000 अंकांपर्यंत उसळी घेतली आहे. बाजाराच्या या सुपररॅलीमध्ये आता गुंतवणूकदार संभ्रमात आहेत की, पैसा लावायचा कुठे? सध्या तेजी दिसणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवायचा की, तेजीतही अंडरपरफॉर्मर असलेले शेअर्सवर शिफ्ट व्हायचे? किंवा डिफेंसिव थीमवर चालणे योग्य राहिल? ते पाहूया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फॉर्च्युन फिस्कलचे डायरेक्टर जगदीश यांनी म्हटले की,  बाजारात छोट्या गुंतवणूकदारांचे पार्टिसिपेशन वेगाने वाढले आहे. BSE वर गुंतवणूकदारांच्या खात्यांची सख्या 8 कोटीहून अधिक झाली आहे. जे 16-17 महिन्यांपूर्वी 5 कोटींच्या आसपास होते. ग्लोबल फॅक्टरच्या ऐवजी एफआयआय आणि डीआयआय सुद्धा बाजारात दमदार गुंतवणूक करीत आहेत.


सध्याच्या घडीला वॅल्युएशनबाबत चिंता नक्कीच आहे. दीर्घ कालावधीच्या गुंतवणूकदारांना काळजी करण्याचे कारण नाही. परंतु त्यांनी देखील डोळे बंद करून गुंतवणूक करण्याची रिस्क घेऊ नये. हाय वॅल्युएशननंतर देखील बाजारात अजुनही अनेक क्वॉलिटी शेअर आहेत. ज्यांचे फंडामेंटल चांगले आहेत. सध्या ते डिफेंसिव सेक्टरमधील समजले जातात. 


डिफेंसिव थीम 
ट्रेड स्विफ्टचे डायरेक्टर संदीप जैन यांचे म्हणणे आहे की, बाजाराच्या तेजीला रिप्राइसिंगच्या स्वरूपात पाहिलं जावं. शेअर बाजारात चांगली तेजी सुरू आहे. डिफेंसिव थीम अजूनही चांगला परफॉमन्स दाखवू शकते. यामध्ये IT, PHARMA आणि FMCG सेक्टरवर फोकस केले जाऊ शकते. सध्या ITC,  नवनीत एज्युकेशन, INFY, सायबर टेक सिस्टिम, सिप्ला आणि FDC ऍक्टिवेट झालेले दिसून येत आहेत.


हे सेक्टरसुद्धा असतील फोकसमध्ये
फार्मा, आयटी, एफएमजीसीच्या ऐवजी कॅपटल गुड्स, इंफ्रा, ऑटो, टेक्सटाइल, एनर्जी आणि OIL शी संबधित शेअर सध्या फोकसमध्ये आहेत. चांगल्या फंडामेंटल्सचे शेअर नक्कीच योग्य अभ्यास करून घ्यायला हवे.