मुंबईः पावसाळा म्हटला की नानातऱ्हेचे रोग हे येतातच त्यामुळे त्यातूनही आपल्याला सर्वत्र काळजी ही घ्यावीच लागते. त्यातून सर्वात जास्त काळाजी ही पावसाळ्यातच घ्यावी लागते आणि या सिझनमध्ये सर्वात जास्त धोका असतो तो मलेरिया या रोगाचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलेरिया झालाच तर सगळ्यांप्रमाणे आपल्यालाही काळजी पडते आणि आपणही नाही नाही ते घरगुती उपाय करू लागतो पण एकूणच कोणते उपाय योग्य आहेत आणि कोणते नाही याची कल्पना मात्र आपल्याला येत नाही. त्यामुळे जे योग्य आणि गरजेचे उपाय आहेत ते करणं हे गरजेचेच आहे पण त्याहूनही ते घरगुती असतील तर त्याहूनही उत्तम. 


आलं
मलेरियामध्ये आल्याचा वापर फायदेशीर ठरतो. यामध्ये असलेल्या जिंजरॉलमध्ये अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे मलेरिया दरम्यान वेदना आणि मळमळ कमी करण्यासाठी मदत करतात. याव्यतिरिक्त आल्यामध्ये मलेरियाविरोधी फाईट करण्याचे गुणधर्म देखील असतात ज्यामुळे मलेरिया टाळता येतो.अर्धा चमचा सुंठ पावडर घेऊन ते अर्धा ग्लास पाण्यात चांगले मिसळा. हे तयार मिश्रण दिवसातून तीन वेळा प्या.


पपईचे पान + मध
मलेरियाच्या उपचारात पपईची पाने वापरता येतात. याशिवाय मलेरियामध्ये रक्ताची कमतरता असेल तरीही पपईचे सेवन फायदेशीर ठरते. 4-6 ताजी पपईची पाने तोडून टाका. 15-20 मिनिटे ती उकळण्यासाठी पाण्यात ठेवा. नंतर ते गाळून त्यात चवीनुसार मध मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा प्या.


मेथी दाणे + पाणी
मलेरियात कमकुवतपणाचा सामना करण्यासाठी मेथी दाणे एक चांगला नैसर्गिक उपाय आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये अँटी-प्लास्मोडियल प्रभाव असतो. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवून मलेरिया पसरवणाऱ्या किडाणूंशी लढण्यासाठी काम करतात. थोड्या प्रमाणात मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी त्यातील पाणी गाळून रिकाम्या पोटी सेवन करा. मलेरिया बरा होईपर्यंत याचे सेवन करा.


तुरटी + साखर
तुरटीमध्ये डासांच्या अळ्यानाशक गुणधर्म आहेत जे मलेरिया पसरवणाऱ्या अॅनोफिलीस डासाच्या चाव्याव्दारे होणाऱ्या संसर्गाशी लढा देऊन मलेरियापासून मुक्त होऊ शकतात. एक ग्रॅम तुरटी पावडर आणि दोन ग्रॅम साखर एकत्र करून मिश्रण तयार करा. मलेरियाचा ताप असल्यास दर दोन तासांनी अर्धा चमचा हे मिश्रण घ्या.