नवी दिल्ली : ...अखेर केंद्रीय मंत्रिमंळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला. पंतप्रधानांनी अनपेक्षीतपणे अनेकांना डच्चू दिला तर, काहींचा खांदेपालट केला. काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली. यात उल्लेखनीय असे की, निर्मला सितारामण यांच्यावर संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली. बऱ्याच काळानंतर एका महिलेकडे या पदाची धूरा आल्यामुळे चर्चा होणे स्वाभाविक. म्हणूच जगभरातील कोणकोणत्या महिलांनी या पदाची धुरा सांभाळली यावर टाकलेला हा एक कटाक्ष...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९८०मध्ये इंदिरा गांधी यांनी भारताच्या संरक्षण पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. त्यानंतर गेली अनेक वर्षे या पदावर महिलेची निवड झाली नव्हती. मोदी सरकारमध्ये निर्मला सितारामण यांच्या रूपाने पुन्हा एकदा ही संधी मिळाली. आजघडीला भारताशिवाय जगभरातील सुमारे १६ देशांमध्ये संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी महिलांकडे आहे. यात बांग्लादेश, जर्मनी, इटली, आणि ऑस्ट्रेलिया आदी देशांचा समावेश आहे


 - भारताचे शेजारील राष्ट्र बांग्लादेशमध्ये शेख हसीना या त्या देशाच्या पंतप्रधान आहेत. पण, सोबतच त्या संरक्षण मंत्रालयाचीही जबाबदारी पार पाडतात.


 - जपानमध्ये टोमोमी इनाडा यांनी संरक्षणमंत्री म्हणून यशस्वी कामगिरी पार पाडली. मात्र, २०१७ मध्ये राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी काही कागदपत्रे लपविल्याच्या आरोपांमुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला.


 - स्पेनमध्ये २०१६ला मारिया डोलेरेस दि यांना संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. स्पेनमध्ये त्यावेळी पीपल्स पार्टी सत्तेवर होती. 


-फ्रान्समध्ये नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर फ्लोरेन्स पाल्ली यांना संरक्षणमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.


- ऑस्ट्रेलियाच्या लिबरल पार्टीच्या सिनेटर मरीस एन पेन यांनी टर्नबुल सरकारमध्ये (२०१५) संरक्षण मंत्रालयाची धुरा सांभाळली.


- स्लोवानियामध्ये (युरोपीय देश) एंद्रेजा कटिक यांनीही काही काळ संरक्षण मंत्री म्हणून कारभार पाहिला.


- इटलीमध्ये रॉबर्टा पिनोट्टी या २०१४ पासून आतापर्यंत संरक्षण मंत्री म्हणून कार्यरत आहेत.


- एकेकाळी हुकूमशाहा हिटलरच्या अधिपत्याखाली असलेल्या जर्मनीतही २०१३मध्ये संरक्षण मंत्रालय एका महिलेकडेच होते.


दरम्यान, दक्षिण आफ्रिका, नेदरलॅंड, निकारागुआ, केनिया, अल्बानिया, नॉर्वे, बॉस्निया आणि हर्जेगोविनामध्येही महिलांनी संरक्षणपदाची धुरा सांभाळली आहे.