मुंबई : तुम्ही विमानाने प्रवास करताना पाहिले असाल किंवा ऐकले असाल की, विमाना प्रवासात लोकांना मदत करण्यासाठी एयर होस्‍टेस (Air Hostess) असतात आणि त्याच लोकांना सगळ्या गोष्टींमध्ये मदत करतात. फ्लाइट अटेंडेंटसाठी विमानात पुरषांपेक्षा स्त्रियांच जास्त पाहायला मिळातात. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की विमानात प्रवाशांच्या मदतीसाठी स्त्रियाच का असतात? विमान कंपन्या या स्त्रियांनाच का फ्लाइट अटेंडेंटसाठी ठेवतात? तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरलाईन्स पुरुषांना फ्लाइट अटेंडंट म्हणून ठेवत नाही असे नाही. परंतु अशा कंपन्यांची संख्या खूपच कमी आहे. काही निवडक एअरलाइन्सच असे करतात की, जे पुरुषांना फ्लाइट अटेंडंट म्हणून कामावर घेतात. त्यांनी या मागचे कारण असे सांगितले की, ते फक्त अशा परिस्थितीसाठीच पुरुषांना फ्लाइट अटेंडंट निवडतात जिथे मेहनत आणि शक्ती खर्च करणे आवश्यक असते.


असा अंदाज आहे की, पुरुष आणि महिला केबिन क्रू मेंबर्सचे प्रमाण 2/10 आहे. काही परदेशी विमान कंपन्यांमध्ये हे प्रमाण अगदी 4/10 असे आहे. परंतु हॉस्पि़टॅलीटीच्या कामांसाठी स्त्रियांनाच प्राधान्य दिले जाते. यामागील अनेक कारणे दिली आहेत. आम्ही यापैकी काही कारण सांगणार आहोत.


1. लोकं कोणत्याही पुरुषापेक्षा स्त्रियांचे बोलणे अधिक काळजीपूर्वक ऐकतात. जेव्हा स्त्रिया फ्लाइटमध्ये आवश्यक सूचनांबद्दल लोकांना सांगताता तेव्हा लोकां ते काळजीपूर्वक ऐकतात आणि त्याचे पालन करतात.


2. प्रवासा दरम्यान सेवा आणि इतर व्यवस्थापनांकडे विशेष लक्ष दिले जाते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये उत्तम व्यवस्थापन करण्याचे कौशल्य असते. तसेच स्त्रिया समोरच्या व्यक्तीचे काळजीपूर्वक ऐकतात, म्हणून या सर्व गोष्टींबद्दल त्यांना चांगले प्रशिक्षण दिले जाऊ शकते.


3. पुरुषांच्या तुलनेत महिला आकर्षक दिसतात. प्रवाशांच्या स्वागताच्या वेळी आणि निरोप घेतानाही पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक शांत आणि नम्र असतात. यामुळे एअरलाईन्सकडे पाहाण्याचा प्रवाशांचा दृष्टीकोन सुधारतो ज्याचा कंपनीला फायदाच होतो.
4. पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक उदार आणि आकर्षक असतात, जी केबिन क्रूसाठी आवश्यक गुणवत्ता मानली जाते. त्याच बरोबर स्त्रिया ग्राहकांच्या समाधानाची खात्री करण्यास सक्षम असतात.


5. सहसा पाहिले जाते की, पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे वजन कमी असते. एअरलाईन्सला कमी वजनामुळे कमी इंधन खर्च करावे लागते, त्यामुळे ते महिलांना जास्त प्राधान्य देतात.