मुंबई : प्रेमात भांडण तर होतं आणि ते होत राहिलं पाहिजे त्याने गोडवा वाढतो. मात्र कधीकधी आपण काही गोष्टी विसरतो आणि त्यामुळे नातं तुटेपर्यंत वाद वाढतो. हा वाद विकोपाला जाऊ नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यावश्यक असतं नाहीतर नातं तुटण्याची भीती असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भांडणातील गोडवा वाढवण्यासाठी 5 टिप्स आवश्यक जपाव्यात. या ट्रिक्स जर तुम्ही वापरल्यात तर भांडण झालं असलं तरी नातं तुटण्यापर्यंत हा वाद विकोपाला जाणार नाही. या टिप्समुळे तुमच्या प्रेमातील गोडवा वाढेल.


1 ब्रेक घेणं आवश्यक


कोणत्याही भांडणात आपण भान सोडून बोलत नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. जर तसं झालं नाही आणि गोष्टी हाताबाहेर जात असतील तर थोडं थांबावं. ब्रेक घेणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे नको त्या गोष्टी घडणार नाहीत. 


थोड्या ब्रेकनंतर जेव्हा तुम्ही पुन्हा पार्टनरशी बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्या गोष्टीकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन तुम्हाला मिळू शकतो. काहीवेळा विषय बदलण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे भांडणातील लक्ष दुसरीकडे वळू शकतं. 


2. चूक मान्य करा


भांडणात नेहमी पार्टनरची चूक दाखवण्यापेक्षा आपलं काय चुकलं याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. कधीकधी आपली चूक नसतानाही केवळ वाद टाळण्यासाठी माफी मागू पुढे जाणं फायद्याचं ठरतं. भांडणात काहीवेळा चूक कबूल करणं किंवा माफी मागणं पार्टनरसाठी महत्त्वाचं ठरू शकतं. त्यामुळे प्रेमही वाढतं.


3. गोष्टी पूर्ण करा


कधीकधी भांडण झाल्यानंतर दोघांचा इगो दुखावला जातो. त्यामुळे बोलून भांडण सोडवण्याऐवजी मनात ते कायम राहातं. अशा परिस्थितीमध्ये नात्यात मोठा दुरावा येऊ शकतो. हा दुरावा टाळण्यासाठी भांडण सोडवणं आवश्यक असतं. गोष्टी पूर्ण करा भलेही मध्ये ब्रेक घ्यावा लागला तरी चालेल. वेळ गेला तरी चालेल मात्र आपलं भांडण मिटेल यासाठी गोष्ट पूर्ण सोडवा. 


4. प्रेमाची मिठी 


प्रत्येक भांडणात दोघंही जण दुखावलेले असतात. त्यामुळे दोघांनाही गरज असते आपुलकी आणि प्रेमाची. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याची. जर तुमच्या एका प्रेमळ मिठीनं संपूर्ण भांडण मिटणार असेल तर ती मिठी नक्की मारा. त्यामुळे कदाचित अबोला संपेल आणि पुन्हा नात्यातील गोड क्षण तुम्हाला अनुभवता येतील. 


5. भांडण्याचीही एक पद्धत असते


भांडण नाही झालं तरी चिंतेचा विषय असतो पण विनाकारण तुमचे मुद्दे ओढूनताणून करू नका. तुमचा मुद्दे नीट मांडा. तुम्हाला काय बोलायचे आहे, कोणत्या मुद्द्यावर राग आहे. आपले म्हणणे मांडण्यासाठी लढण्यापूर्वी 15-20 मिनिटे तयारी करावी लागली तरी ती काही वाईट होणार नाही. मात्र भांडण नको तेवढं खेचू नका.