Finance Ministry Rule for Cheque Bounce: चेक बाऊंस प्रकरणं अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी केंद्र सरकार आता नवा नियम आखण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. उद्योग संगठन पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीनं हल्लीच अर्थ मंत्रालयाकडे सदर बाबतीत पावलं उचलण्यासाठीची विनंती केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(Cheque Bouce) चेक बाऊंस प्रकरणांमध्ये बँकेतून (Bank) पैसे काढण्यासाठी काही दिवसांची बंदी किंवा त्यासारख्याच कारवाईचे नियम आखावेत ज्यामध्ये चेक देणारे उत्तरदायी असतील ही बाब अधोरेखित करण्यात आली होती. 


कोणात्या खात्यातून कापले जाणार पैसे? 
अर्थ मंत्रालयाकडून (Finance Ministry) जर याबाबतचा नियम लागू केला जातो, तर चेक देणाऱ्या व्यक्तीच्या दुसऱ्या खात्यातून पैसे कापले जातील. शिवाय नवं खातं सुरु करण्यावरही बंदी असेल अशा अनेक नियमांवर सध्या विचारविनीमय सुरु आहे. चेक बाऊंसप्रकरणी हल्लीच अर्थ मंत्रालयाकडून उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये हे पर्याय समोर आले. 


अधिक वाचा : Aadhar Card Update : आधारकार्डाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी...


सध्याच्या घडीला चेक बाऊंस प्रकरणांवर आणि कारवाईवर कायद्याची करडी नजर असल्याचं दिसत आहे. यातूनच जर चेकमध्ये नमूद असणाऱ्या खात्यात पैसे नसतील तर त्याच व्यक्तीच्या दुसऱ्या खात्यातून पैसे कापले जाण्याचा नियम दृष्टीक्षेपात आला. 


सदरील नियमांना मान्यता मिळाल्यास देयकाला निर्धारित रक्कम देणं बंधनकारक असेल. परिणामी ही प्रकरणं न्यायालयापर्यंत पोहोचणारच नाहीत आणि व्यवहारही सुकर होतील. खात्यात पैसे नसूनही चेक देण्याचं प्रमाणही कमी होईल.