कोची : केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांच्याविरोधात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. चांडी यांच्यासह काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय. सौरउर्जा गैरव्यवहारातील आरोपी सरिता नायरच्या आरोपांनंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'राजकीय नेत्यांसह गार्ड करायचे सेक्स'


 


ओमन चांडी यांनी २०१२ साली लैंगिक शोषण केल्याचा आरोप सरिता नायरने केलाय. न्यायालयीन समितीने केलेल्या चौकशीनंतर चांडी, वेणूगोपाल आणि इतर काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल झालाय. सौरउर्जा गैरव्यवहारात कंत्राट मिळवून देण्यासाठी चांडी आणि इतर काँग्रेस नेत्यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप सरिता नायरने केलाय. या गैरव्यवहार प्रकरणात चांडी यांच्या तीन कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचं आढळलं आहे.