मुंबई : बिहारच्या किशनगंज विधानसभा मतदान संघातील भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जैसवाल आणि उमेदवार स्वीटी सिंह विरोधात प्राथमिक गुन्हा दाखल झाला आहे. आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैसवाल यांच्या व्हिडिओची तपासणी केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेघरिया येथील आंची देवी जैन यांच्या परिसरात गुरूवार बैठक आयोजित केली होती. यावेळी जैसवाल यांनी व्यापारी वर्गाशी संवाद साधला. या बैठकीत त्यांनी व्यापारीवर्गाला निवडणूकीच्या दिवशी दुकानं बंद ठेवण्याकरता सांगितले. पुढे ते म्हणाले की, कर्मचाऱ्यांना 500 रुपये द्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 


स्विटी सिंहने विरोधी उमेदवारावर आरोप केला आहे. त्यांनी कट करून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. जैसवाल यांनी फक्त कार्यकर्त्यांच्या नाश्ता आणि जेवणकरता पैसे देण्याबाबत वक्तव्य केलं होतं. यासंदर्भात बोलण्याकरता जैसवाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो झाला नाही. 


बिहारमध्ये लोकसभेची एक जागा समस्तीपुर आणि विधानसभेच्या पाच जागा किशनगंज, सिमरी बख्तियारपूर, दरौंदा, नाथनगर येथे आहेत. तर बेलहरसाठी उपनिवडणूक 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तसेच महाराष्ट्र आणि हरयाणा येथे देखील आज 21 ऑक्टोबर रोजी मतदान सुरू आहे.