नवी दिल्ली : तामिळनाडू येथील विरुधुनगर ज्ल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखाण्याला आग लागली आहे. शुक्रवारी दुपारी आग लागल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण आहे. महत्त्वाचं म्हणजे या भीषण आगीत ११ जणांचा मृत्यू झाला असून 36 जण गंभीर जखमी आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जेव्हा ही आग लागली तेव्हा फटाके तयार करण्यासाठी त्यामध्ये काही रसायने त्यात मिळवली जात होती.' ही  आग तामिळनाडूमधील अच्छानकुलम गावात लागली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच अग्नितशामन दलाच्या 10 गाड्या आग विझवण्यासाठी दाखल झाल्या. 


दरम्यान, विरुधुनगरमधील फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत मरण पावलेल्यांची संख्या 11 वर गेली तर 36 जखमी मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपये आणि गंभीर जखमींना 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50,000 रुपयांची घोषणा केली आहे.