नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममधील बंगालच्या खाडीमध्ये कार्यरत असलेल्या एका जहाजाला सोमवारी अचानक आग लागली. काही वेळातच ही आग सगळीकडे पसरू लागली आणि हळहळू संपूर्ण जहाजात ही आग पोहोचली. यावेळी जहाजामध्ये 29 क्रू मेंबर होते. पण आग लागल्यानंतर सर्वांनी खोल समुद्रात उड्या मारल्या. भारतीय कोस्ट गार्डने यातल्या 28 जणांचे प्राण वाचवले. यातील एकजण अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी शर्थईचे प्रयत्न सुरु आहेत. सकाळी साडे अकराच्या सुमारास ही आग लागली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ऑफशोर सपोर्ट वेसल कोस्टल जगुआर नावाचे हे जहाज आहे. समुद्रात ये-जा करणाऱ्या जहासांना रसद पुरविण्याचे काम हे जहाज करते. सोमवारी यात अचानक आग लागली. यातील कर्मचाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उडी घेत स्वत:चे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला. आग नेमकी कशामुळे लागली ? याचे कारण अद्याप समोर आले नाही. याचा देखील तपास सुरु करण्यात आला आहे.