देशाची राजधानी दिल्लीसह (Delhi) अनेक राज्यात प्रदूषणानात (Pollution) मोठी वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहेत. अशातच दिवाळी (Diwali) सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात फटाके (firecrackers) फोडण्यात येत आहे. या फटाक्यांमुळे प्रदूषणात (Pollution) भर पडत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. दिल्लीत (Delhi) फटाक्यांवर (firecrackers) बंदी आहे, तरीही अनेक लोक फटाके फोडत आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये, यावेळी दिवाळीत फटाके फोडणाऱ्या कुटुंबांची संख्या पाच टक्क्यांनी अधिक असण्याची शक्यता आहे. कारण प्रत्येक 5 पैकी 2 कुटुंबे फटाके फोडण्याची शक्यता आहे. एका सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे. (firecrackers pollution percentage comparison cigarette in diwali)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सर्वेक्षणानुसार, सुमारे 10 टक्के लोकांनी सांगितले की त्यांनी आधीच दिल्लीतील दुकानांमधून फटाके विकत घेतले आहेत. 20 टक्के लोकांनी सांगितले की त्यांनी इतर एनसीआर शहरांमधून फटाके विकत घेतले आहेत. त्यामुळे फटाक्यांच्या विक्रीवर कोणतीही बंदी नाही. पण कोणत्या फटाक्यामुळे किती प्रदूषण होते हे तुम्हाला माहिती करुन घेण्याची गरज आहे.


सापाची गोळी : एक सापाची गोळी जाळून 64,500 मायक्रोग्राम/क्यूबिक मीटर कण बाहेर सोडले जातात, जे 2,932 सिगारेट पेटवण्याएवढे आहेत. जेव्हा तुम्ही सिगारेटपेटवता तेव्हा 22 मायक्रोग्राम/क्यूबिक मीटर PM2.5 कण बाहेर पडतात. त्यामुळे सापाची गोळी जाळताना नक्कीच विचार करा.


1000ची माळ : 1000ची फटाक्यांची माळ पेटल्यावर, 38,540 मायक्रोग्राम/क्यूबिक मीटर कण बाहेर पडतात, जे 1752 सिगारेट पेटवण्याइतके असतात. 1752 एवढ्या सिगारेटमधून निघणारा PM2.5 हा प्रदूषणकारी घटक 1000च्या फटाक्यांच्या माळे एवढा असतो.


हंटर बॉम्ब : हंटर बॉम्ब फोडल्याने 28,950 मायक्रोग्राम/क्यूबिक मीटर कण बाहेर पडतात, जे 1316 सिगारेट जाळण्याइतके आहेत. जेव्हा  एक सिगारेट पेटवता तेव्हा 22 मायक्रोग्रॅम/क्यूबिक मीटर PM2.5 कण बाहेर पडतात.


सुरसुरी : अनेकजण सुरसुरीला हलक्यात घेतात. त्यामुळे प्रदूषण होत नाही, असा त्यांचा समज आहे. पण हे चुकीचे आहे. सुरसुरी जाळल्‍यावर 10,390 मायक्रोग्रॅम/क्यूबिक मीटर कण बाहेर पडतात जे 472 सिगारेट पेटवण्या सारखंच आहे.


चक्री : दिवाळीला चक्री जाळणे अनेकांना आवडते. एक चक्री जाळल्याने 9,490 मायक्रोग्राम/क्यूबिक मीटर कण बाहेर पडतात, जे 431 सिगारेट पेटवण्याएवढे आहे.