उत्तर प्रदेशमध्ये भरदिवसा तरुणीची गोळ्या घालून हत्या
उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आणि सरकार बदलले असले तरी गुन्हे मात्र कमी झालेले नाही. गुन्हेगारांच्या मनात अजूनही कायद्याची भीती निर्माण झालेली नाही. गाजियाबादमध्ये अज्ञात बाईकस्वारांनी भरदिवसा एका युवतीची गोळ्या घालून हत्या केली आहे.
गजियाबाद : उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आणि सरकार बदलले असले तरी गुन्हे मात्र कमी झालेले नाही. गुन्हेगारांच्या मनात अजूनही कायद्याची भीती निर्माण झालेली नाही. गाजियाबादमध्ये अज्ञात बाईकस्वारांनी भरदिवसा एका युवतीची गोळ्या घालून हत्या केली आहे.
पोलीस अशा लोकांना तर दूर पण त्यांची ओळख पटवण्यात सुद्धा अपयशी ठरतांना दिसत आहे. हत्येचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. पोलिसांकडून अजून तपास सुरु आहे.
माहितीनुसार राजेंद्र नगर येथे राहणारी रमा चतुर्वेदी नोएडा सेक्टरमध्ये एका कॉलसेंटर कामाला होती. रोजच्या प्रमाणे गुरुवारी ती ऑफिसला जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान तिला कोणीतरी फोन करून खाली बोलवलं. त्यानंतर जशी तिने स्कुटी सुरु केली मागून २ जणांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या. लोकांना काही कळण्यापूर्वीच हल्लेखोर तेथून फरार झाले.