Crime News : आताचा तरूण वर्ग सोशल मीडियाच्या आधीन गेलेला आपण पाहतो. सोशल मीडियावर लाईक्स, फॉलोवर्स वाढण्यासाठी कोण काय करेल काही सांगता येत नाही. अशातच एका नवऱ्याने त्याच्याच बायकोचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ शुट करत फेसबुकवर अपलोड केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय आहे प्रकरण? 
आरोपी पतीने त्याच्या बायकोला एक महिन्यापूर्वी व्हिडीओ कॉल केला होता. त्यावेळी त्याची पत्नी अंघोळीला चालली होती, ती अंघोळीला गेली तरी दोघेही व्हिडीओ कॉलवर बोलत होते. यादरम्यान पतीने बायको अंघोळ करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याने संपूर्ण व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला. 


व्हिडीओ फेसबुवक अपलोड केल्यावर पतीच्या फेसबुक खात्याचे फॉलोवर्स मोठ्या प्रमाणात वाढले. पत्नीला यासंदर्भात माहिती झाल्यावर तिने नवऱ्याला व्हिडीओ डिलीट करायला लावला, मात्र पतीने व्हिडीओ काही डिलीट केला नाही. शेवटी पत्नीने पोलिसात धाव घेतली. तक्रार दाखल झाल्यानंतर पतीने व्हिडीओ उडवला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी फेसबुक अकाऊंट बंद केलं आहे.


आरोपी नवरा हा दिल्लीतील उत्तम नगर इथं राहत असून तो सर्कसमध्ये काम करतो.  त्याची पत्नी सध्या कासगंजला तिच्या आईसोबत राहते, दोघांचंही लव मॅरेज असून त्यांच्या लग्नाला 3 वर्ष झाली आहेत. महिलेचा पती सोशल मीडियावर तो सक्रिया असायचा त्याला आपले फॉलोवर्स वाढवायचे होते. त्यामुळे त्याने बायकोचा व्हिडीओ अपलोड केला होता. उत्तर प्रदेशमधील फिरोजाबादमधून हे प्रकरण समोर आलं आहे.