मुंबई : पोलिसांनी आतापर्यंत अनेकांचा माज उतरवला आहे. दादागिरी करणारे पोलिसांचा खाक्या मिळताच गपगुमाने पळ काढतात.  असाच एक प्रकार मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये घडला आहे. एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात ते चाकू घेऊन घुसले. येथे तो सर्वांना उघडपणे धमक्या देत होता. 'माझे नाव बादशाह आहे. मी आत्तापर्यंत 6 खून केले आहेत, 7 वा तुझा नंबर आहे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरे तर हे प्रकरण भोपाळच्या हबीबगंज भागातील आहे. जिथे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता बिअरबारमध्ये बाऊन्सरचे काम करणारा शुभम उर्फ ​​बादशाह ठाकूर नावाचा तरुण करतार बिल्डिंगमध्ये चालणाऱ्या महिंद्रा फायनान्सच्या कार्यालयात पोहोचला. चाकूच्या धाकावर त्याने कंपनीतील 50-60 कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले. फायनान्स कंपनीचे मॅनेजर शिवेंद्रसिंग बघेल यांच्यासमोर चाकू दाखवत तो म्हणाला की, 'बादशाह माझे नाव आहे. तुम्ही मला ओळखत नाही, मी 6 खुनांमध्ये आरोपी आहे.


ज्यावेळी हा बदमाश फायनान्स कंपनीच्या लोकांना धमकावत होता, त्यावेळी कोणीतरी त्याचा हा व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर तो सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ पाहताच हबीबगंज पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला पकडले. तेव्हा पोलिसांनी त्याचे कान धरले. यानंतर त्याचा सूर बदलला. सर, मी चुकलो. मी कोणाचा ही खून केलेला नाही.


पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. सोडा साहेब, या नंतर मी कधीच असं करणार नाही. मी एकही खून केलेला नाही. मात्र, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कंपनी आपले कार्यालय दुसरीकडे हलवत होती. मात्र इमारत मालक त्यांना जागा खाली करण्यास नकार देत होते. यामुळे त्यांनी मॅनेजरला धमकावण्यासाठी आपला बाउन्सर पाठवला होता. पोलिसांनी मालक नवीन अरोरा याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.