नवी दिल्ली : लडाखमधील Galwan Valley गलवान खोऱ्यामध्ये असणाऱ्या भागात १५-१६ जूनला रात्री india भारत आणि china चीन या दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली. हे स्वरुप इतकं हिंसक होतं की यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. शेजारी राष्ट्राच्या अर्थात चीनच्या सैन्यातील जवळपास ४३ जवानांनाही यात प्राण गमवावे लागले. सीमावादाच्या या मुद्द्याला मिळालेलं चिंता वाढवणारं हे वळण पाहता चीननं कांगावा करण्यासही सुरुवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिस्थितीचं गांभीर्य पाहता इथं भारतात चर्चा आणि बैठकांच्या सत्रांना वेग आला. अखेर India-China Clash  आणि violent face off नंतर चीनचे परराष्ट्र मंत्री आणि भारताचे परराष्ट्र मंत्री यांच्यात उच्चस्तरिय चर्चा झाली. ज्यामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी परखडपणे देशाची भूमिका मांडली. 


गलवानमध्ये जे काही घडलं ते पूर्वनियोजित आणि साचेबद्ध पद्धतीनं घडवून आणण्यात आलं होतं. ज्याचे परिणाम म्हणजे या सर्व घटना आहेत, असं जयशंकर यांनी चीनला खडसावलं. दोन्ही देशांनी चीनचे पचर्चेच्या मार्गानं या वादावर तोडगा काढण्यास सहमती दर्शवली असली तरीही भारताकडून तीव्र शब्दात नाराजी मात्र स्पष्टपणे व्यक्त करण्यात आली. 




डिवचल्यानंतर चीनकडून शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याला प्राधान्य 


दोन्ही देशांत असणारे मतभेद पाहता चर्चेतूनच समस्य सोडवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी यावेळी सद्यस्थितीला उपलब्ध असणाऱ्या पर्यायांचा वापर करत आणि योग्य तो समन्वय साधत हा प्रश्न सोडवण्याचा सूर आळवला. सुरुवातीला भारताला डिवचणाऱ्या चीननं यावेळी मवाळ भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. 


 


सीमावादाच्या मुद्द्यावरुन दोन्ही देशांमध्ये झालेली हिंसक झ़डप पाहता प्रकरणी नियंत्रणाबाहेर जात असल्याची शक्यता निर्माण होताच चीनकडून काहीशी सौम्य भूमिका घेतली गेली. त्यामुळं आता दोन्ही राष्ट्रांचं एकमत झाल्यामुळं परिस्थितीचा दाह काहीसा कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.