Social Media Viral Video: मानव जातीचा इतिहास लाखो वर्ष जुना आहे. उत्क्रांतीमुळे नवी उमेद निर्माण झाली आणि मानवाची प्रगतीचा नवी चालना मिळाली. लाखो वर्षांपासून काही मानवी जमात जंगलात वास्तव्य करते, त्याला सर्वजण आदिवासी म्हणून संबोधतो. आजच्या 21 व्या शतकात देखील जगाच्या अनेक भागात लोकं आदिवासी म्हणून राहतात. कित्येकदा त्यांचा बाहेरचा जगाशी संबंधही येत नाही. अशातच आता 29 वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. (first time a tribal saw a fair person touched and was surprised this video goes viral on internet)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. खरंतर हा व्हिडिओ 1993 सालचा आहे. या व्हिडिओमध्ये एक आदिवासी पहिल्यांदाच एका गोर्‍या माणसाला भेटतो. त्याला पाहून तो पूर्णपणे चकित होतो. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे उघडेच्या उघडे राहिले आहेत.


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ अनोखा आणि वेगळा आहे. जंगलात एक माणूस एका आदिवासी माणसाला कसा भेटतो हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. जंगलात राहिल्यामुळे त्या व्यक्तीला फारसं ज्ञान नसतं. तो जगाविषयी अनभिज्ञ असल्याने तो व्यक्तीला स्पर्श करून लगेच मागे सरकतो.


पाहा व्हिडीओ -



दरम्यान, व्हायरल झालेल्या व्यक्तीच्या नाकात पारंपारिक पद्धतीने एक लाकूड लावल्याचं दिसतंय. लहानपणापासून आदिवासी जमातीची विशेष ओळख जपून रहावी, यासाठी ही परंपरा असते. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेकजण या व्हिडीओला शेअर करताना दिसत आहेत.