नवी दिल्ली : पडुचेरीमध्ये प्रथमच भाजप सरकारचा भाग होणार आहे. अशाप्रकारे, कर्नाटकनंतर हे दक्षिणेकडील दुसरे केंद्रशासित प्रदेश आहे. जेथे भाजप सत्तेत सहभागी असणार आहे. 6 एप्रिलला झालेल्या निवडणुकांमध्ये एनडीएने 30 सदस्यांच्या विधानसभेत 16 जागा जिंकल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एआयएनआरसीचे प्रमुख रंगास्वामी यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. यापैकी 10 जागा एन. रंगस्वामी यांच्या नेतृत्वाखालील एआयएनआरसीने तर 6 जागा भाजपने जिंकल्या आहेत. सोमवारी रंगस्वामी यांनी लेफ्टनंट गव्हर्नर तमिलिसाई सौंदर्यराजन यांची भेट घेऊन सरकार स्थापण्याचा दावा केला.


उपराज्यपाल यांनी म्हटलं की, रंगास्वामी लवकरच शपथविधीची तारीख जाहीर करतील. रंगास्वामी यांची एआयएनआरसी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली आहे.


उपराज्यपाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मन्नाडिपेडचे आमदार आणि माजी पीडब्लूडी मंत्री ए.नमाशिवयम आणि भाजपचे निर्मल कुमार सुराना हे देखील उपस्थित होते.


पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की शपथविधी 7 किंवा 9 मे रोजी होऊ शकतो. भाजपने राज्यात नऊ जागांसाठी उमेदवार उभे केले होते. ज्यापैकी 6 जागा त्यांनी जिंकल्या. एआयएनआरसीने 16 जागांवर उमेदवार उभे केले होते.