नवी दिल्ली : जगात लष्करी ड्रोन्सचा प्रभावी वापर केला जातो आहे. इंडियन आर्मीही यात मागे नाही. मात्र आता प्रथमच इंडियन आर्मीने एका दहशतवादविरोधी कारवाईत, थेट चकमक सुरू असताना, ड्रोन वापरून दहशतवाद्यांना ठार मारलं आहे.


भारताचा दहशतवाद्यांवर ड्रोन प्रतिहल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचं जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑलआऊट सुरूच आहे. भारताकडून दहशतवाद विरोधी कारवाईत आतापर्यंत ड्रोन्सचा वापर केवळ दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी केला जात होता. मात्र आता इंडियन आर्मीनं एका चकमकीत थेट ड्रोन्सचा वापर करून दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. 


दहशतवादाचं कंबरडं मोडण्यासाठी ड्रोन वापर


रविवारी पुलवामा जिल्ह्यात पाहू या भागात दहशतवाद्यांच्या एका छुप्या अड्ड्यावर लष्करानं कारवाई केली. इथं लष्कर ए तोयबाचा बडा कमांडर असल्याची गुप्त माहिती भारतीय आर्मीला मिळाली होती. एका घरामागे लपलेल्या या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी आर्मीने थेट ड्रोन कॅमेरा पाठवला. या ड्रोनचा कॅमेरा एवढा शक्तीशाली होता की दहशतवाद्यांचं स्पष्ट फुटेज आर्मीला मिळालं.


दहशतवाद्यांच्या बारीकसारीक हालचाली आर्मी टिपत होती. यातले दोन दहशतवादी वारंवार वर ड्रोनकडे पाहात होते. त्यांनी ड्रोनवर गोळीबार करण्याचाही प्रयत्न केला. तर तिसरा आरोपी सतत कोणाशी तरी फोनवर बोलत होता. दहशतवाद्यांची पोझिशन समजल्यावर त्यांना घेरून ठार मारणं सोपं गेलं. 


आर्मीने पद्धतशीरपणे या दहशतवाद्यांची पोझिशन पाहून त्यांना कंठस्नान घातलं. इंडियन आर्मी आता ऑपरेशन्समध्ये ड्रोन्सची मदत घेतंय. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने युद्धाचे आयाम मोठ्या प्रमाणात बदलले आहेत. त्याचंच हे उदाहरण.