नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये एक असा प्रकार समोर आला आहे ज्यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. PUBG गेमची भारतात सध्या क्रेज वाढत आहे. संपूर्ण जगात हा गेम सध्या तरुणांच्या आकर्षणाचं केंद्र बनला आहे. पबजी हा गेम आतापर्यंत 5 कोटीहूऩ अधिक जणांनी डाऊनलोड केला आहे. हा गेम खूपच चर्चेत आहे. नवीन-नवीन अपडेट्समुळे नव्या गोष्टी या गेममध्ये येत आहे. ज्यामुळे तरुणांचा कल या गेमकडे वाढत आहे. पण या गेममुळे आता लोकं मानसिक आजाराचे शिकार होत आहेत. पबजी खेळण्याची सवय धोकादायक ठरु शकते. जम्मू-काश्मीरमध्ये एका फिटनेस ट्रेनरचं मानसिक संतुलन यामुळे बिघडलं आहे. तो स्वत:लाच मारुन घेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 दिवस हा गेम खेळता खेळता त्य़ाला याचं असं व्यसन लागलं की आता तो स्वतःलाच मारत आहे. त्याने स्वत:लाच जखमी करुन घेतलं आहे. त्यानंतर उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टर्स देखील हा प्रकार पाहून हैराण झाले आहेत. फिटनेस ट्रेनरला पबजीचं व्यसन लागल्याने त्याचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलं आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.


हे पण वाचा: व्हिडिओ गेममुळे भविष्य आणि आरोग्य दोन्ही धोक्यात


पबजी जगातील सर्वाधिक विकला गेलेला 5 वा गेम आहे. पबजीमुळे मानसिक संतुलन बिघडल्याचं हे सहावं प्रकरण आहे. याआधी देखील 5 प्रकरणं समोर आली होती. जम्मू-काश्मीरमध्ये याचं प्रमाण अधिक आहे. जम्मू-काश्मीरच्या लोकांना गर्व्हनर सत्यपाल मलिक यांना विनंती केली आहे की, त्यांनी राज्यात या गेमवर बंदी घालावी.


याआधी बंगळुरुमध्ये देखीस 15 वर्षाच्या मुलावर उपचार झाले. हा गेम मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये बनवला गेला आहे. आतापर्यंत 5 कोटी जणांना तो डाऊनलोड केला आहे. जूनमध्ये हा सर्वात चर्चेत आलेला गेम होता. हा गेम आता फोन आणि कंप्यूटरमध्य़े देखील सुरु झाला आहे.