Howrah-Mumbai Express Derailed: झारखंडच्या चक्रधरपूर येथील बारामम्बो रेल्वे स्थानकाजवळ हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस अपघातग्रस्त झाली आहे. रेल्वेचे तीन डब्बे रुळांवरुन घसरल्याचे समोर आले आहे. सध्या या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची पुष्टी करत चक्रधरपूर रेल्वे मंडळाचे वरिष्ठ अधिकारी डीसीएम आदित्य कुमार चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच चक्रधरपुर रेल्वे मंडळाचे अधिकारी चक्रधरपूर रेल्वे मंडळातून रिलीफ ट्रेन आणि जिल्हा प्रशासनाकडून रुग्णवाहिका घटनास्थळाकडे रवाना केल्या आहेत. सध्या कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही. त्याचबरोबर, प्रशासनाने हेल्पलाइन नंबरदेखील जारी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस (12810) रेल्वे रूळांवरुन घसरली आहे. ट्रेनचे पाच डब्बे रूळांवरुन घसरल्यानंतर मालगाडीला धडकले आहेत. या अपघातात 25हून अधिक लोक जखमी झाले आहे. तर, 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना राजखरसवा आणि बडाबाम्बो दरम्यान झाली होती. हावडा-मुंबई मेल एक्सप्रेसचा सकाळी 3.43 वाजता अपघात झाला आहे. 


मालगाडीला धडकली


मिळालेल्या माहितीनुसार, हावरा-मुंबई मेल एक्स्प्रेसचे पाच डब्बे रूळांवरुन घसरल्यानंतर बाजूलाच उभ्या असलेल्या मालगाडीला जाऊन धडकले. रेल्वे अधिकाऱ्यांनी या अपघातात डझनभर अधिक प्रवासी जखमी झाल्याची पुष्टी केली आहे. जखमींना चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी रेल्वेचे अधिकारीदेखील दाखल झाले आहेत. 


अपघातानंतर रेल्वेचे काही फोटोदेखील समोर आले आहेत. हा अपघात कसा घडला हे मात्र अद्यापही समोर आलेले नाही. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाहीये.  घटनास्थळी रुग्णवाहिका आणि रेस्क्यू टीम पाठवण्यात आली आहे. तसंच, सर्व जखमी रुग्णांची प्रकृती आता स्थिर आहे. 


रेल्वेने जारी केलेल हेल्पलाइन नंबर  


टाटानगर- 06572290324
चक्रधरपुर- 06587 238072
राउरकेला- 06612501072, 06612500244
हावड़ा- 9433357920, 03326382217
रांची- 0651-27-87115.
एचडब्ल्यूएच हेल्प डेस्क- 033-26382217, 9433357920
एसएचएम हेल्प डेस्क- 6295531471, 7595074427
केजीपी हेल्प डेस्क- 03222-293764
सीएसएमटी हेल्पलाइन ऑटो नंबर- 55993
पी एंड टी- 022-22694040
मुंबई- 022-22694040
नागपुर- 7757912790