5 वर्षांच्या चिमुकलीचा सोमवारी सकाळी गंगा नदीत बुडून मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार चिमुकलीच्या आईसमोर घडला पण याची तिला भनकही नव्हती. बुडणाऱ्या मुलीकडे न पाहता आई रिल बनवण्यात व्यस्त होती. धक्कादायक बाब म्हणजे ही रिल मुलीची मावशीच बनवत होती आणि तिच्या कॅमेऱ्यात मुलीच्या बुडण्याचा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने मृलीचा मृतदेह 2 तासांनी बाहेर काढण्यात आला. ज्यानंतर पंचनामा करुन शव मुलीच्या पालकांकडे देण्यात आला. हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशातील गाजीपुरच्या सैदपुर परिसरातील घाटावरील आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाराणसीतील चौबेपुर येथील उमराह गावातील संदीप पांडे यांची पत्नी अंकिता पांडे आपल्या एकुलत्या एका मुलीला तान्याला घेऊन छठ पूजेसाठी माहेरी सैदपुरमधील बोरवा गावात वडील कपिल मिश्रा यांच्या घरी गेली होती. 



सोमवारी छठ पूजेकरीता गंगा स्नानाला अंकिता, त्यांची पाच वर्षांची मुलगी, आई लक्ष्मी, बहिण आणि इतर परिवार गेला होता. इतर मुलांसोबत तान्या आंघोळ करत होती. तर मावशी आणि आजी गंगा नदीचा आनंद घेत होत्या. यावेळी अंकिता तान्याची आई या प्रकाराचा व्हिडीओ, रिल्स बनवत होती. 


गंगा नदीत आंघोळ करताना तान्या अचानक खोल पाण्यात बुडू लागली. पाहता पाहता तान्या पाण्यात खोल बुडू लागली. ज्यावेळी तान्या बुडत होती तेव्हा अंकिता बहिण आणि अन्य लोकांचे व्हिडीओ तयार करत होती. महत्त्वाचं म्हणजे तान्या बुडत असतानाचा संपूर्ण प्रकार तिच्या कॅमेऱ्यात कैद झाला. खूप वेळ तान्या दिसली नाही तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. तेव्हा ते तिला शोधू लागले पण तोपर्यंत खूप उशिर झाला होता.